दरवाढीनिषेधार्थ काँग्रेसचा राज्यात रेल रोको

By admin | Published: June 26, 2014 12:59 AM2014-06-26T00:59:21+5:302014-06-26T00:59:21+5:30

रेल्वे प्रवास भाडेवाढीच्या निषेधार्थ राज्यात बुधवारी कॉँग्रेस कार्यकत्र्यानी ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन केले.

Stop the railing of Congress in the state of UP | दरवाढीनिषेधार्थ काँग्रेसचा राज्यात रेल रोको

दरवाढीनिषेधार्थ काँग्रेसचा राज्यात रेल रोको

Next
>मुंबई : रेल्वे प्रवास भाडेवाढीच्या निषेधार्थ राज्यात बुधवारी कॉँग्रेस कार्यकत्र्यानी ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या काही गाडय़ा विलंबाने धावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यकत्र्यानी रेल्वे रोखल्या होत्या. 
मराठवाडय़ात लातूर रेल्वे स्टेशनवर अर्धा तास आंदोलन झाले. परभणीत सचखंड एक्स्प्रेस एक तास रोखून धरण्यात आली होती. उस्मानाबादमध्ये परळी-मिरज एक्स्प्रेस जवळपास 1क् मिनिटे रोखून धरली होती. परळीत कार्यकत्र्यानी मालगाडी अडवून घोषणाबाजी केली़ औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करीत रेल्वे स्थानक दणाणून सोडले. नगरसोल-नरसापूर रेल्वे सुमारे एक तास अडवली. 
नाशिकमध्ये मनमाड व इगतपुरीत रेल रोको आंदोलन झाले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या काही गाडय़ा विलंबाने धावल्या.  खान्देशात जळगावमध्ये पदाधिका:यांसह सुमारे 2क्क् कार्यकत्र्यानी अहमदाबाद-हावडा गाडी अडवून, ठिय्या देत नरेंद्र मोदी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. भुसावळमध्ये मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस अर्धा तास रोखण्यात आली. धुळे, नरडाणा आणि दोंडाईचा येथेही रेल्वे रोको झाले. 
दरवाढ मागे घेईर्पयत आंदोलन
संपूर्ण दरवाढ मागे घेईर्पयत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. दरवाढीच्या निषेधार्थ राज्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. रालोआच्या खासदारांना घेराव घालण्याचेही निश्चित झाले असल्याचे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Stop the railing of Congress in the state of UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.