पाण्यासाठी २६ गावांचा रस्ता रोको

By admin | Published: October 22, 2016 11:33 PM2016-10-22T23:33:05+5:302016-10-22T23:33:05+5:30

सांगोला तालुक्यातील २६ गावांतील शेतकऱ्यांनी टेंभू योजनेतून व नीरा उजवा कालव्यांतर्गत फाटा क्र.५ मधून माण नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे भरून

Stop the road to 26 villages | पाण्यासाठी २६ गावांचा रस्ता रोको

पाण्यासाठी २६ गावांचा रस्ता रोको

Next

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला तालुक्यातील २६ गावांतील शेतकऱ्यांनी टेंभू योजनेतून व नीरा उजवा कालव्यांतर्गत फाटा क्र.५ मधून माण नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत, म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून बंधारे भरून द्यावेत, माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन हक्काचे व कायमस्वरूपी पाणी द्यावे, या मागण्यांसाठी शनिवारी मिरज रेल्वे गेटवर रस्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनाला सांगोला शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून पाठिंंबा दिला. रस्ता रोकोमुळे मिरज-सांगोला रोडवरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या वेळी आमदार डॉ. गणपतराव देशमुख आंदोलनाला पाठिंंबा देण्यासाठी आले असता, आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी त्यांना काहीच न बोलू दिले नाही. पाणीप्रश्नावर आपणाला बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात त्यांना देशमुखांना विरोध केला़ त्यानंतर, आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून देशमुखांनी काढता पाय घेतला. (वार्ताहर)

Web Title: Stop the road to 26 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.