कांद्याच्या हमीभावासाठी जिल्ह्यात रास्ता रोको
By admin | Published: May 6, 2016 03:10 PM2016-05-06T15:10:00+5:302016-05-06T15:10:00+5:30
कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ६ : कांद्याचे भाव कवडीमोल झाले असून उत्पादन शुल्क वसूल होत नसल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.
नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी रास्तारोको झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. कांद्याचे भाव वाढले तर सरकार हस्तक्षेप करून निर्यातमुल्य वाढवते. आज भाव कमी झाले आहेत. तर शेतकर्यांना हमीभाव द्यायला हवा. तसेच वीज बिल माफी, कर्जमाफी,जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात यावा. मनमाड व नांदगांव शहराच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये सुधारणा व्हावी. यासाठी शासनाने निधी द्यावा. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राधाकिसन सोनवणे संतोष गुप्ता अरु ण पाटील शैला गायकवाड बाळकाका कलंत्री राजेश पगारे बबलू पाटील साईनाथ गिडगे विश्वास आहिरे सुनील जाधव विनोद शेलार महेंद्र गायकवाड हबीब शेख कांतीलाल छाजेड डॉ.भरत जाधव डॉ. सुरेश गायकवाड किसन जगधने सुमीत गुप्ता संदीप पगारे ज्ञानेश्वर पवार धनराज बुरकुल आदिंच्या सह्या आहेत. (लोकमत ब्युरो)