सुरेगावला दीड तास रस्ता रोको : नाशिक-औरंगाबाद महामार्ग विस्कळीत
By admin | Published: May 26, 2016 04:54 PM2016-05-26T16:54:26+5:302016-05-26T17:02:53+5:30
येवल्यात कांद्याला दोन हजार प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 26 - येवल्यात कांद्याला दोन हजार प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा, जलयुक्त शिवाराची कामे तातडीने सुरु करावी, पिण्याच्या पाण्याची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसाठी सुरेगाव रस्ता येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यासह ग्रामस्थांनी शासनाचा निषेध करीत, अच्छे दिन कब आनेवाले है...अशी विचारणा करीत शासनावर थेट तोफ डागत २६ मे गुरुवारी नाशिक - औरंगाबाद महामार्गावर सुरेगाव येथे ग्रामस्थांनी सुमारे दीड तास रस्ता रोको केला. यामुळे नाशिक औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक खोळंबली.
सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक बाबासाहेब डमाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आंदोलन केले.जनमानसाची नस ओळखणारे तहसीलदार अगोदरच रास्ता रोको आंदोलनस्थळी पोहोचले होते. आणि ग्रामस्थांसह सर्वांचे म्हणणे एकूण घेतले. दुष्काळग्रस्त शेतकर्याचे अनुदान आण िपाणी टॅॅकर का वेळेवर पोहचत नाही या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन देवून आपली कांदा भाव व अन्य मागण्याबाबतची संवेदना शासनापर्यंत पोहचवतो असे सांगितले.या निवेदनाची प्रत तहसिलदार शरद मंडलिक यांना आंदोलनकर्त्यांनी दिली.