वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

By Admin | Published: September 6, 2015 01:34 AM2015-09-06T01:34:50+5:302015-09-06T01:34:50+5:30

राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने

Stop water supply from the water park | वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

googlenewsNext

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने त्वरित बंद करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर केवळ गरजेपुरता करावा, यासाठी पक्षाच्या वतीने पाणीबचतीबाबत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया तर गेला आहेच, त्याचबरोबर राज्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट फोफावलेले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यावर खबरदारी म्हणून आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एकही तलाव यंदा भरलेला नाही. त्यातच मान्सूनही १५ दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याने मुंबईला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. ही बाब लक्षात घेता वर्षभराचा विचार करून वॉटर पार्क, मॉल्सना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, केवळ पिण्यासाठीच पाणी वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास मोठी बचत
मुंबईत गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे शौचालयातील फ्लशसाठी शेकडो लीटर पाणी लागते. घरात होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास पाण्याची मोठी बचत करता येऊ शकते, याबाबत मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.

Web Title: Stop water supply from the water park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.