मीरा रोड, भिवंडीच्या गोदामात २० कोटींच्या गुटख्याचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 02:01 AM2018-03-25T02:01:17+5:302018-03-25T02:01:17+5:30

बंदी असलेल्या गुटख्याचा २0 कोटी रुपयांचा साठा मुंबईजवळील मीरा रोड व भिवंडीतील गोदामांमध्ये असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. पाच राज्यांतून तो मुंबईसाठी पाठविला जात असून, ही गोदामे अन्न-औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेला आव्हान देणारी ठरली आहेत.

Storage of Gutka of 20 crores in Mira Road, Bhiwandi Warehouse | मीरा रोड, भिवंडीच्या गोदामात २० कोटींच्या गुटख्याचा साठा

मीरा रोड, भिवंडीच्या गोदामात २० कोटींच्या गुटख्याचा साठा

googlenewsNext

- राजेश निस्ताने

मुंबई : बंदी असलेल्या गुटख्याचा २0 कोटी रुपयांचा साठा मुंबईजवळील मीरा रोड व भिवंडीतील गोदामांमध्ये असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. पाच राज्यांतून तो मुंबईसाठी पाठविला जात असून, ही गोदामे अन्न-औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेला आव्हान देणारी ठरली आहेत.
मुंबईत पाच राज्यांमधून गुटखा येतो. तो राज्याच्या ग्रामीण भागात पाठविला जातो. मुंबईतील जोगेश्वरी, नालासोपारा, वाशी, सांताक्रुझ, अंधेरी, भिवंडी ही गुटख्याची प्रमुख केंद्रे मानली जातात. मीरा रोड व भिवंडीत गुटख्याची मोठी गोदामे आहेत. ट्रान्सपोर्ट आणि चहापत्तीच्या नावाखाली गुटख्याची तस्करी होते. ‘भाई’ हा ट्रान्सपोर्टचा मालक असून, ‘बाबू’ त्याचा मॅनेजर आहे. गुटख्याच्या एका पोत्यामध्ये ५० हजार रुपयांचा माल असतो. प्रत्येक पोत्याच्या वाहतुकीसाठी तीन हजार रुपये भाडे आकारले जाते.
मालाची संपूर्ण सुरक्षा वाहतूक व्यावसायिक घेतो. पोलीस, अन्न व औषध प्रशासन, आरटीओ चेक पोस्ट, जीएसटी हे सर्व विभाग त्या भाईने बांधले असल्याचे व्यवसायातील लोक सांगतात. त्यामुळे नेहमीचे अधिकारी-कर्मचारी त्यांचा गुटखा पकडत नाहीत. यापूर्वी नव्याने आलेल्या एका पोलीस अधिकाºयाने भिवंडीच्या गोदामांवर धाडी टाकून सुमारे दोन कोटींचा गुटखा, पान मसाला जप्त केला होता.

परराज्यांत कारखाने : भिवंडीतील या ‘भाई’चे बंगळुरू, हैदराबादमध्ये गुटखा बनविण्याचे कारखाने आहेत. एक्का, दिलबाग हे ब्रँड तेथे बनविले जातात. हाच ब्रँड चेकपोस्ट चुकवून मुंबईजवळच्या गोदामांत येतो आणि पुढे तो पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यात पाठविला जातो.

‘एफडीए’मूग गिळून : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे गुटख्याची तस्करी सुरू आहे, परंतु तेथील वरिष्ठ अधिकारी ‘मूग गिळून’ आहेत. धाडीची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाºयांनीही गुटखा तस्करी रोखण्याची दक्षता घेतलेली नाही. ‘एफडीए’चे बहुतांश अधिकारी गुटखा तस्करांच्या दावणीला बांधलेले असल्याचे बोलले जाते. या विभागाचे ‘इन्टलिजन्स अधिकारी’ गुटखा तस्करीचे मार्ग शोधण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Storage of Gutka of 20 crores in Mira Road, Bhiwandi Warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.