‘आम्ही महाराष्ट्रीयन’ गाण्याची गोष्ट आज ‘मी मराठी’वर
By admin | Published: May 1, 2016 03:41 AM2016-05-01T03:41:01+5:302016-05-01T03:41:01+5:30
‘लोकमत’ने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची गोष्ट आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मी मराठी’ वाहिनीवर उलगडली जाणार आहे. महाराष्ट्राचे गुणगौरव करणारे हे गीत मराठी
मुंबई : ‘लोकमत’ने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची गोष्ट आज १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मी मराठी’ वाहिनीवर उलगडली जाणार आहे. महाराष्ट्राचे गुणगौरव करणारे हे गीत मराठी - हिंदीतील प्रमुख अशा २१ गायकांनी गायले आहे.
सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रूपकुमार राठोड, जावेद अली, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, अजित परब, सुनाली राठोड, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आदींचा या गाण्यात सहभाग असून, मराठीतील आघाडीचा अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या गाण्याची चित्रफीत दिग्दर्शित केली आहे. या गाण्याच्या निर्मितीमागची गोष्ट सांगण्यासाठी कवी, गीतकार अरुण म्हात्रे, संगीत दिग्दर्शक परीक्षित भातखंडे, प्रख्यात गायिका
वैशाली सामंत, तरुण पिढीचा गायक
मंगेश बोरगावकर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मी मराठी वाहिनीवर एक तासाचा विशेष कार्यक्रम १ मे रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसारित केला जाणार असून, दुपारी ३ वाजता आणि रात्री ११ वाजता त्याचे पुन:प्रक्षेपण होणार असल्याची माहिती मी मराठीचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी दिली.
आज सगळ्या चित्रपटगृहांतही
यूएफओच्या माध्यमातून राज्यभरात ज्या ज्या चित्रपटगृहांत चित्रपट दाखवले जातात त्या सगळ्या ठिकाणी १ मेच्या निमित्ताने प्रत्येक शोच्या आधी या गाण्याचा १ मिनिटाचा भाग दाखवला जाणार आहे. हे गाणे यूट्युबवर ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ असे टाकल्यास सहज उपलब्ध असून, www.lokmat.com या साईटवर ते पाहता येईल.