औरंगाबादेत एमआयएम, बसपाची ताकद वाढली

By admin | Published: April 23, 2015 05:27 PM2015-04-23T17:27:25+5:302015-04-23T17:27:25+5:30

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत एमआयएम आणि बसपा या पक्षाची ताकद वाढली आहे.

The strength of the MIM, the BSP grew in Aurangabad | औरंगाबादेत एमआयएम, बसपाची ताकद वाढली

औरंगाबादेत एमआयएम, बसपाची ताकद वाढली

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - औरंगाबाद महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत एमआयएम आणि बसपा या पक्षाची ताकद वाढली आहे.
मराठवाड्याची आर्थिक राजधानी असलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे निकाल जाहिर झाले. ५१ जागा मिळवित सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला औरंगाबादकरांनी सत्तेच्या जवळ नेवून ठेवले आहे पण स्पष्ट बहुमत दिले नाही. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्टये म्हणजे औरंगाबादकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाला पसंती देण्यापेक्षा एमआयएम व बसपा सारख्या पक्षांना पसंती देणे पसंत केले. हैदराबादचा पक्ष असलेल्या एमआयएमला औरंगाबादकरांनी शिवसेनेनंतर दुस-या क्रमांकाच्या २२ जागा दिल्या तर राष्ट्रवादीपेक्षा २ जागा अधिक देत मायावतीच्या बसपाच्या खात्यात ५ जागा टाकल्या. शिवसेनेला २९, भाजप २२, एमआयएम २५, काँग्रेस १०, रिपब्लिकन पक्ष १ तर अपक्षांना १८ जागा मिळाल्या आहेत.

Web Title: The strength of the MIM, the BSP grew in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.