पंतप्रधानांचे हात मजबूत करावेत
By Admin | Published: January 22, 2016 01:43 AM2016-01-22T01:43:52+5:302016-01-22T01:43:52+5:30
देशात असहिष्णुतेची भावना आहे असे बोलले जात आहे; पण मला तसे वाटत नाही. पण देश अनेक अडचणींतून पुढे जात आहे.
पुणे : देशात असहिष्णुतेची भावना आहे असे बोलले जात आहे; पण मला तसे वाटत नाही. पण देश अनेक अडचणींतून पुढे जात आहे. अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला सारून पंतप्रधांनांचे हात बळकट करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी केले.
सिंबायोसिस संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभादरम्यान सिन्हा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. देशात निंदनीय अशा काही घटना घडल्या आहेत. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण देशात अराजक आहे, अशी परिस्थिती नाही. देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे, असे म्हटले जात असले, तरी सिंबायोसिमध्ये तसेच अनेक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, अशा कार्यक्रमांना, कलाकारांना प्रोत्सादन देण्याची आवश्यकता आहे. ‘एनिथिंग बट खामोश’ या आत्मचरित्राविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिन्हा म्हणाले, रील आणि रिअल लाईफमध्ये ज्यांचा कुणी गॉडफादर नाही, त्या परिस्थितीशी झगडून वाटचाल करणाऱ्या तरुणांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. (प्रतिनिधी)