बोपखेलमध्ये तणाव निवळला

By admin | Published: May 24, 2015 12:27 AM2015-05-24T00:27:41+5:302015-05-24T00:27:41+5:30

बोपखेल, रामनगर, गणेशनगर भागांतील दैनंदिन व्यवहार आज तिसऱ्या दिवशी पूर्वपदावर आले. दुकाने उघडी होती.

Stress in Bopkhel | बोपखेलमध्ये तणाव निवळला

बोपखेलमध्ये तणाव निवळला

Next

पिंपरी : बोपखेल, रामनगर, गणेशनगर भागांतील दैनंदिन व्यवहार आज तिसऱ्या दिवशी पूर्वपदावर आले. दुकाने उघडी होती. बस आणि रिक्षा प्रवाशी वाहतूक कायम होती. मात्र, तणाव काहीसा कायम होता. दोन दिवसांतील पोलिसांचा ताफा कमी झाला होता. त्यांची संख्या तुरळक झाली होती.
सीएमईने आपल्या हद्दीतील रहदादारीचा रस्ता सर्वांसाठी त्वरित खुला करावा, या मागणीसाठी बोपखेलच्या रहिवाशांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यास हिंसक वळण लागले. त्यात झालेल्या दगडफेक आणि लाठीमारात असंख्य नागरिक आणि पोलीस जखमी झाले. अनेकांची धरपकड करीत पोलिसांनी अनेकांना अटक केली.
यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या लाठीमारामुळे नागरिकांनी काल शुक्रवारी बंद पाळला होता. त्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिसरात प्रचंड तणाव होता. नागरिकांअभावी रस्ते ओस पडले होते.
चौकाचौकांत असलेला मोठा पोलीस फाटा आज काढून घेण्यात आला होता. बापुजीबुबा चौकात, तसेच प्रवेशद्वाराच्या आतमध्ये पोलीस पथक तैनात होते. त्यात महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दंगल नियंत्रक वाहन आणि व्हॅन होती.
पोलीस कोठडीत एका दिवसाने वाढ
भोसरी पोलिसांनी १०० पुरुष आणि ७१ महिलांना अटक केली. त्यांतील १८ जणांना पोलीस कोठडी शनिवारी संपली. त्यांना आज खडकी न्यायालयात हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत कोठडी देण्यात आली.
यामध्ये श्रीरंग धोदाडे, गुलाब भालेराव, अमित घुले, रोहन घुले, विकास गोगावले, अमर वाल्मीकी, रवींद्र घुले, दत्तात्रय घुले, प्रभाकर सरवदे, चेतन देवकर, बाबू राठोड, सुमीत कदम, दीपक घुले, इसान शेख, श्याम मेवाती, संदीप चौगुले, राहुल धुसिया, निखिल घुले यांचा समावेश आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.
बांगर यांना वगळता उपचारानंतर सोडण्यात आले आहे. यातील बहुतेक जण पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी ग्रामस्थांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)

काही ठिकाणी तणाव
४आज तिसऱ्या दिवशी मात्र जनजीवन पूर्वपदावर आले. रहिवाशांनी आपले दैनंदिन व्यवहार सुरू केले. दुकाने उघडण्यात आली होती. त्यामुळे गरजेच्या वस्तू आणि किराणा साहित्याची खरेदी केली गेली. मात्र, रस्त्यावर नागरिकांची ये-जा करण्याचे प्रमाण वाढले होते. पीएमपी बस वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत होती. दापोडीहून येता येत नसले, तरी येथून रिक्षा प्रवासी वाहतूक विनाअडथळा सुरू होती. भोसरी व विश्रांतवाडी मार्गावरून नागरिकांनी भरलेल्या रिक्षा गावातील बापुजीबुवा चौकापर्यंत येत होत्या. बोपखेल गावठाण परिसरात मात्र तणाव जाणवत होता. असंतोष खदखदत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

जखमी पोलीस कर्तव्यावर
४दगडफेकीत जखमी झालेले पोलीस तिसऱ्या दिवशीही बंदोबस्तात होते. आपली जखम विसरून ते कर्तव्यासाठी उन्हात उभे राहून सेवा बजावत होते. पायाला दुखापत झाल्याने काही कर्मचारी एका पायाने लंगडत ये-जा करताना दिसत होते.

रस्ता खुला करण्याची मागणी
सीएमई हद्दीतील बोपखेल ते दापोडी हा रस्ता मानवतेच्या दृष्टिकोनातून खुला करण्याची मागणी कॉँग्रेसच्या मानवाधिकार विभागाचे प्रदेश कार्यकारी अधिकारी मॅन्युअल डिसुजा यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावकऱ्यांच्या प्राथमिक व अत्यावश्यक सेवांबाबत संवेदनशीलपणे विचार करावा. शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी वाहतूक व्यवस्था, बाजारपेठेसाठी पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करत असल्याने हा रस्ता खुला असावा. या संदर्भात योग्य तोडगा काढून भूमिपुत्रांना पूर्वीप्रमाणे रस्ता खुला करावा, अशी मागणी डिसुजा यांनी राव यांच्याकडे केली आहे.

Web Title: Stress in Bopkhel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.