धार्मिक भावना दुखावल्याने तणाव

By admin | Published: September 26, 2015 01:42 AM2015-09-26T01:42:48+5:302015-09-26T01:42:48+5:30

ईदच्या नमाज पठणानंतर पोलीस निरीक्षकाने धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने नशिराबादमध्ये शुक्रवारी सकाळी तणाव निर्माण झाला होता

Stress due to hurt feelings of religious sentiments | धार्मिक भावना दुखावल्याने तणाव

धार्मिक भावना दुखावल्याने तणाव

Next

जळगाव : ईदच्या नमाज पठणानंतर पोलीस निरीक्षकाने धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने नशिराबादमध्ये शुक्रवारी सकाळी तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने दगडफेक करुन वाहनांच्या काचा फोडल्या.
वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक आर. के. नगराळे यांना निलंबित करण्यात आले. १०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नगराळे
यांना निलंबित केल्यावर वातावरण शांत झाले. नशिराबादमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नगराळे यांची नेमणूक राखीव म्हणून करण्यात आली होती. नमाजाच्या ठिकाणी ड्युटी नसताना
ते तेथे आले. मला काही बोलायचे आहे, असे सांगून त्यांनी माईकचा
ताबा घेतला. त्यांनी वादग्रस्त
वक्तव्य करण्यास सुरुवात
केल्याने कार्यकर्ते भडकले. त्यामुळे संतप्त झालेला एक गट त्यांच्या
अंगावर धावून गेला. काहींनी त्यांना बदडलेही. एका ग्रामपंचायत सदस्याने नगराळे यांना तेथून हलविले. त्यांना उपअधीक्षक कार्यालयात थांबविण्यात आले आहे. नगराळे यांनी तरसोद येथेही माईकचा ताबा घेऊन सरपंच निवडीच्या वेळी इंग्रजीतून भाषण केले होते. त्यांना याआधीही निलंबित करण्यात आले होते. नगराळे यांच्या निवृत्तीला ३७ दिवस बाकी असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Stress due to hurt feelings of religious sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.