दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - संजय राठोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:24 AM2023-03-24T05:24:17+5:302023-03-24T05:24:31+5:30
सुरेश धस यांनी बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मुंबई : राज्यात दुधात होणारी भेसळ खपवून घेतली जाणार नाही. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला असून, याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत सांगितले.
सुरेश धस यांनी बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला. मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय व पेटंट ट्रेडमार्कचे कार्यालय गुजरातला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यावर सरकारने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निवेदन द्यावे, असे निर्देश उपसभापतींनी दिले.