ठेवीदारांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्याची गरज- मंगल प्रभात लोढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:54 AM2018-07-18T05:54:28+5:302018-07-18T05:54:33+5:30
सहकारी बँका, सहकारी संस्था आणि आर्थिक संस्थांमधील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्याा हितांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कायदा आणावा, अशी मागणी भाजपा सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्दयाद्बारे केली.
नागपूर : सहकारी बँका, सहकारी संस्था आणि आर्थिक संस्थांमधील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्याा हितांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कायदा आणावा, अशी मागणी भाजपा सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्दयाद्बारे केली.
सिटी कोआॅपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर बँकेतील लाखो गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. अशाच प्रकारच्या अनेकदा घडल्या आहेत. सामान्य ठेवीदार आणि गुंतवणूक दारांच्या हितांचे रक्षण होणे गरजेचे आहे. गरीब, मजूर आणि सामान्य जनतेच्या सिटी कोआॅपरेटीव्ह बँकेत जमा असलेला पैसा परत करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करत बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी लोढा यांनी केली. तत्पूर्वी सोमवारी उशीरा रात्री विधानसभेत सहकारी बँका व सहकारी पतसंस्थांच्या खातेदार व गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी संशोधन प्रस्तावावर बोलताना ठेवी आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी कडक कायदा बनविला जावा. सामान्यांचे कोट्यवधी रूपये बुडविणा-यांना दोन- चार वर्षांची शिक्षा आणि पाच- दहा लाखांचा दंड हा अगदीच किरकोळ आहे. त्यासाठी कठोर शिक्षाच हवी , असे ते म्हणाले.