पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला कडेकोट बंदोबस्त! पेन, किल्ल्या आणि चिल्लर ही नेण्यास मनाई
By संजय पाठक | Published: May 15, 2024 01:03 PM2024-05-15T13:03:20+5:302024-05-15T13:04:41+5:30
कांदा निर्यात बंदीमुळे यंदा नाशिक मध्ये नाराजीचे वातावरण असून त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळी गोंधळ किंवा आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून त्यासाठीच ही तपासणी करण्यात येत आहे.
नाशिक (पिंपळगाव बसवंत)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे होत आहे दुपारी एक वाजता होणाऱ्या सभेसाठी नाशिक तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते सभास्थळी पोहोचत आहेत मात्र संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून किमान चार ते पाच ठिकाणी नागरिकांची काटेकोर तपासणी केली जात आहे.
सभेच्या ठिकाणी प्रवेश देताना कोणत्याही प्रकारे मोबाईल पॉवर बँक, पेन, किल्ल्या (चाव्या) किंवा खिशात चिल्लरही ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर डोक्यावरील कॅप काढून त्याखाली काही ठेवले नाही ना याचीही तपासणी करण्यात येत आहे. भाजपाच्या वतीने काही व्हीआयपी पास देण्यात आले असून अशा व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे.