संपामुळे एसटी महामंडळाचे झाले ३०५ कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 08:46 AM2021-11-21T08:46:22+5:302021-11-21T08:46:28+5:30
कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे. त्यात ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ आगार बंद पडले आहेत. मात्र, आतापर्यंत पूर्णक्षमतेने बसेस धावत नाही.
मुंबई : एसटी कर्मचारी संपामुळे एसटी महामंडळाचे दररोज १३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या २४ दिवसांत संपामुळे महामंडळाला ३०५ कोटींचा तोटा झाला आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झाली आहे. त्यात ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ आगार बंद पडले आहेत. मात्र, आतापर्यंत पूर्णक्षमतेने बसेस धावत नाही.
यामुळे एसटी महामंडळाला संपामुळे दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचा महसुलावर पाणी सोडावे लागले, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. तर संपामुळे एसटीच्या संचित तोट्यात वाढ झाली असून तो १३ हजार कोटींच्या घरात जाण्याची भीती एसटी महामंडळाकडून वर्तवण्यात येत आहे.