पहिल्या सहामाहीत एसटीची कोटींची उड्डाणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:17 AM2019-01-03T02:17:43+5:302019-01-03T02:17:53+5:30

एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे.

 Strike flights in the first half! | पहिल्या सहामाहीत एसटीची कोटींची उड्डाणे!

पहिल्या सहामाहीत एसटीची कोटींची उड्डाणे!

Next

मुंबई : एसटी प्रशासनाने तब्बल चार वर्षांनंतर केलेल्या १८ टक्के भाडेवाढीमुळे २०१८च्या पहिल्या सहामाहीत २०१७च्या तुलनेत प्रशासनाच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटींनी वाढ झाली आहे. २०१४ नंतर एसटी प्रशासनाने थेट जून २०१८ मध्ये प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ केली होती. त्यामुळे एसटीला मोठा नफा कमावता आला आहे.
एसटीच्या प्रवासी संख्येत २०१४-१५ या कालावधीत तब्बल ११ कोटी प्रवाशांची घट झाली होती. २०१३-१४ला २५६ कोटी प्रवाशांवरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २४५ कोटींपर्यंत घसरली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या एसटी प्रशासनाने वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून सलग चार वर्षे प्रवासी टिकविण्यात यश मिळविले आहे. ‘हात दाखवा आणि एसटी थांबवा’, ‘आवडेल तिथे प्रवास’, ‘मोफत वायफाय’ अशा विविध संकल्पनांद्वारे एसटीने खासगी व बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात कंबर कसल्याची प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.
देओल यांनी सांगितले की, दोन मोठ्या गावांसह शहर व गावांना जोडणाºया शटल सेवा सुरू केल्याचा मोठा फायदा एसटीला झाला आहे. यामुळे प्रवाशांना निश्चित सेवेची हमी मिळाली आहे. दरम्यान, वेळापत्रकाचे अचूक पालन केल्याचा फायदा शटल सेवांसह सर्वसामान्य प्रवासी वाहतुकीसाठीही झाला आहे. एसटीसह एसटी स्थानकांवर स्वच्छता ठेवण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान
२०१७च्या पहिल्या सहामाहीत एसटी प्रशासनाने साडेतीन हजार कोटींहून कमी कमाई केली होती. याउलट २०१८च्या पहिल्या सहामाहीत प्रशासनाने ३ हजार ७७८ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. दरम्यान, डिझेलच्या दरातील वाढ आणि कामगारांची पगारवाढ यामुळे प्रशासनाच्या खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, महसुलातील तूट भरून काढण्यासाठी प्रवासी संख्या वाढवून महसुलात आणखी वाढ करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Web Title:  Strike flights in the first half!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.