रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाची धडक कारवाई
By admin | Published: July 11, 2017 06:30 PM2017-07-11T18:30:51+5:302017-07-11T18:30:51+5:30
बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल
Next
>ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 11 - बेकायदा खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थांशी निगडीत उत्पादनांना पायबंद घालण्याकरीता रायगड जिल्हा अन्न व आैषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक माेहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल तालुक्यांतील शिरढाेण येथील आरएनपी आॅईल अॅन्ड फूड्स प्रा.लि. या कंपनीवर छापा घालून, तब्बल 10 लाख 440 रुपये किमतीचा माेहरी आणि तिळाच्या तेलाचा बेकायदा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रायगड अन्न व आैषध प्रशासनाचे उपायूक्त दिलीप संगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.
रायगड अन्न व आैषध प्रशासनाचे अन्न निरिक्षक बालाजी शिंदे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत, 1 लाख 52 हजार 660 रुपये किमतीच्या माेहाेरी तेलाच्या 500 मि.लि.च्या 1 हजार 796 बाटल्या, 3 लाख 11 हजार 860 रुपये किमतीच्या माेहरी तेलाच्या एक लिटरच्या 2 हजार 12 बाटल्या, तर 5 लाख 35 हजार 920 रुपये किमतीच्या तिळाच्या तेलाच्या एक लिटरच्या 2 हजार 552 बाटल्या जप्त करण्यात आल्याचे संगत यांनी पूढे सांगीतले.
आरएनपी आॅईल अॅन्ड फूड्स प्रा.लि. या कंपनीकडे तेल वा खाद्य पदार्थ निर्मीतीचा काेणताही परवाना नसल्याचे तसेच तेलाच्या शास्त्रीय चाचणीकरीता आवश्यक प्रयाेगशाळाही या कंपनीत नसल्याचे या कारवाई दरम्यान निष्पन्न झाले आहे. तेलाचे नमुने घेवून ते सरकारी प्रयाेगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. अन्न व आैषध कायद्यांन्वये कंपनीवर पूढील कारवाई करण्यात येत असल्याचे संगत यांनी अखेरीस सांगीतले.