बोगस पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कडक कारवाई - तावडे

By admin | Published: April 1, 2016 01:39 AM2016-04-01T01:39:17+5:302016-04-01T01:39:17+5:30

राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबना आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र्र पॅरामेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट, २०११ ला राष्ट्रपतीनी मंजुरी दिली आहे. यानुसार नियम तयार करण्याचे काम

Strong action against Bogus Pathology Lab - Tawde | बोगस पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कडक कारवाई - तावडे

बोगस पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध कडक कारवाई - तावडे

Next

मुंबई : राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबना आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र्र पॅरामेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट, २०११ ला राष्ट्रपतीनी मंजुरी दिली आहे. यानुसार नियम तयार करण्याचे काम सुरू असून, ही नियमावली तयार झाल्यानंतर बोगस पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध अधिक कडकपणे कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॅथॉलॉजी लॅब्स आहेत. एडस्, स्वाईन प्लू, आदी गंभीर आजारांच्या तपासणीचे प्रमाण हे ३०% आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मधुमेह, कोलेस्ट्रॉल आदी आजाराची वैद्यकीय चाचणी करण्याकरिता तालुक्याच्या गावी जावे लागते. त्यामुळे पॅथॉलॉजी लॅबवर सरसकट कारवाई करताना या गोष्टीसुद्धा तपासून घेणे क्रमप्राप्त आहे. ज्या पॅथॉलॉजी लॅब चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात, अशा पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अंतर्गत कारवाई सुरू आहे, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Strong action against Bogus Pathology Lab - Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.