अप्रशिक्षित ज्येष्ठ शिक्षकांची पात्रतेसाठी धडपड

By admin | Published: February 11, 2016 01:52 AM2016-02-11T01:52:32+5:302016-02-11T01:52:32+5:30

आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागांतर्गत शाळांतील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९पर्यंत शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची

The struggle for the eligibility of untrained senior teachers | अप्रशिक्षित ज्येष्ठ शिक्षकांची पात्रतेसाठी धडपड

अप्रशिक्षित ज्येष्ठ शिक्षकांची पात्रतेसाठी धडपड

Next

मुंबई : आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागांतर्गत शाळांतील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९पर्यंत शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट शासनाने घातली आहे. अप्रशिक्षित ज्येष्ठ शिक्षकांना या अटीतून सूट देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे.
सेलचे उपाध्यक्ष महादेळ सुळे यांनी सांगितले की, अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षित झाले नाही, तर त्यांची सेवा समाप्त होणार आहे. या शिक्षकांची शारीरिक क्षमता लक्षात घेता शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा ज्येष्ठ शिक्षकांना फायदा होणार नाही. ज्येष्ठ शिक्षकांसाठी तोंडी परीक्षा व अनुभव या निकषावर मूल्यमापन करून प्रमाणपत्र देण्याची गरजही सुळे यांनी व्यक्त केली.
सेवा समाप्त झाल्यावर त्यांना निवृत्तिवेतनालाही मुकावे लागणार आहे, परिणामी रस्त्यावर यावे लागेल. आणि हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असेही सुळे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The struggle for the eligibility of untrained senior teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.