एसटीचा बीओटीला फाटा - रावते

By admin | Published: April 13, 2016 01:56 AM2016-04-13T01:56:44+5:302016-04-13T01:56:44+5:30

बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजे बीओटी तत्त्वाऐवजी आता एसटी महामंडळ स्वत:च राज्यात नवीन आधुनिक बसस्थानकांची उभारणी करेल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते

ST's bota phata - will be there | एसटीचा बीओटीला फाटा - रावते

एसटीचा बीओटीला फाटा - रावते

Next

मुंबई : बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजे बीओटी तत्त्वाऐवजी आता एसटी महामंडळ स्वत:च राज्यात नवीन आधुनिक बसस्थानकांची उभारणी करेल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
बीड, येवला, उस्मानाबाद, रत्नागिरी, रहिमतपूर, मसवड, संगमनेर या एसटी बसस्थानकांच्या दुरवस्थेबाबत माजी मंत्री राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. बीओटीवर ही स्थानके उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता एसटी महामंडळ स्वत:च त्यांची उभारणी करेल. भांडवली कामांसाठी यंदा १२५ कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे, असे चर्चेला उत्तर देताना रावते यांनी स्पष्ट केले.
राज्यात ७६८ बसस्थानके असून त्यातील तातडीची गरज असलेली स्थानके एसटी महामंडळ विकसित करणार आहे. या आधी सरकार एसटी महामंडळाला स्वतंत्र निधी भांडवली कामांसाठी देत नसे. मात्र, आता राज्य सरकारने यंदा १२५ कोटींचा निधी भांडवली कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
प्रवासी करापोटी जे उत्पन्न सरकारला मिळते, त्यातील ४१९ कोटींचे उत्पन्न सरकार एसटीला देणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळ स्वत:च्या निधीतून एसटी स्थानके विकसित करेल, असे रावते म्हणाले.
एसटी महामंडळाच्या बसगाड्यांबाबत, दर्जाबाबत तक्रारी असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने नवीन स्मार्ट बसगाड्या एसटीत आणण्याचे ठरविले आहे. एसटी महामंडळात प्रथमच २०० सुरक्षा रक्षकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: ST's bota phata - will be there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.