एसटी ‘शिवशाही’चा यंदाचाही मुहूर्त हुकला

By admin | Published: January 25, 2017 03:59 AM2017-01-25T03:59:28+5:302017-01-25T03:59:28+5:30

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील एसी शिवशाही बसची गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात घोषणा केली होती.

ST's 'Shivshahi' has also begun | एसटी ‘शिवशाही’चा यंदाचाही मुहूर्त हुकला

एसटी ‘शिवशाही’चा यंदाचाही मुहूर्त हुकला

Next

मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत भाडेतत्त्वावरील एसी शिवशाही बसची गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात घोषणा केली होती. निविदा प्रक्रियेस लागलेला विलंब आणि अन्य काही समस्यांमुळे शिवशाही बस ताफ्यात येऊ शकली नाही. मात्र महामंडळाने दोन शिवशाही बस ताफ्यात आणण्यासाठी तयारी केली आणि २0१७मधील २३ जानेवारीचा मुहूर्त ठरविला. परंतु हा मुहूर्तही हुकला असून, या बसमध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
खासगी वाहतुकीकडे गेलेल्या एसटीच्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षभरात चांगलीच कंबर कसली आणि अनेक सुविधा प्रवाशांसाठी आणण्याचा निर्णय घेतला. यात सर्वांत महत्त्वाची घोषणा व मोठा प्रकल्प असलेल्या एसटीच्या एसी शिवशाही बसचाही समावेश होता. परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेत जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. या सोहळ्यानंतर ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस अशा ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगत लवकरच शिवशाही ताफ्यात येईल, अशी माहिती वारंवार देण्यात आली. परंतु ही बस नियोजित कालावधीत एसटीच्या ताफ्यात दाखल झाली नाही. त्यामुळे २0१६च्या एप्रिल ते जून, गणेशोत्सव, दिवाळी या गर्दीच्या हंगामात एसटीला आर्थिक फटका बसला.
ही बस आणण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे एका कंपनीने पुढाकार घेतला. मात्र, मोठ्या प्रमाणात बस भाडेतत्त्वावर देतानाच, त्यात एसटीकडून लादण्यात आलेल्या अटींमुळे फायदा होत नसल्याने कंपनीने माघार घेतली. त्यामुळे एसटी महामंडळावर मोठी नामुश्की ओढवली. सदर कंपनीकडून दोन शिवशाही बस तयारही ठेवण्यात आल्या होत्या. ॉ परंतु बसमध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने हा मुहूर्तदेखील हुकला. (प्रतिनिधी)

Web Title: ST's 'Shivshahi' has also begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.