एसटीची 222 आगारे तोटय़ात!

By admin | Published: July 6, 2014 12:29 AM2014-07-06T00:29:58+5:302014-07-06T00:29:58+5:30

एसटीच्या तिकिटांमध्ये भरमसाठ वाढ केली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळावरील आर्थिक संकट कायम आहे.

STT 222 commissions! | एसटीची 222 आगारे तोटय़ात!

एसटीची 222 आगारे तोटय़ात!

Next
अकोला : एसटीच्या तिकिटांमध्ये भरमसाठ वाढ केली असली, तरी महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळावरील आर्थिक संकट कायम आहे. महामंडाळाची 249 पैकी 222 आगारे आर्थिक तोटय़ातून मार्गक्रमण करीत आहेत. त्यापैकी 58 आगारे तर 1क् वर्षापासून सातत्याने तोटय़ात असल्याचे समोर आले आहे. सद्य:स्थितीत महामंडळाला दरदिवशी 2 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. 
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील विविध गावांना जोडण्याचे काम एसटीमुळेच शक्य झाले आहे. 1948 साली सुरू झालेली एसटी आज खेडय़ापाडय़ात जाऊन पोहोचली आहे. एसटीच्या 15 हजार 5क्क् गाडय़ा दररोज धावतात. एसटीची 249 आगारे असून 57क् स्थानके आहेत. याशिवाय 4 हजार मार्गस्थ प्रवासी निवारे आहेत. एसटीकडून सध्या सर्वसाधारण, परिवर्तन, हिरकणी, एशियाड, शिवनेरी, अश्वमेध, शीतल या विशेष गाडय़ा तसेच सिटी बसही चालविण्यात येतात. एसटीतर्फे प्रवाशांना विविध प्रकारच्या 24 सवलती दिल्या जातात. याशिवाय ‘आवडेल तेथे प्रवास’सारखे उपक्रम देखील महामंडळ राबवित आहे. एवढा मोठा डोलारा टिकवून ठेवणो महामंडळाला आता परवडण्यासारखे राहिलेले आहे. 
आर्थिक तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय एसटीकडे अन्य पर्याय नाही. गत आर्थिक वर्षात एसटीवर डिङोल दरवाढीमुळे 48 कोटींचा, तर कर्मचा:यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे 1क्क् कोटींचा भार पडली. ही तूट भरून काढण्यासाठी एसटीने 1 जूनपासून 2.48 टक्के भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीतून 1क्क् कोटींचे उत्पन्न महामंडळाला अपेक्षित असले, तरी 68 कोटींची तूट कायमच राहणार आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे प्रवासीभाडे कमी असल्याने महामंडळावर आर्थिक बोजा पडत असल्याचे मत महामंडळातील अधिका:यांनी व्यक्त केले. परिणामी, एसटीच्या आगारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत एसटीच्या 249 पैकी 222 आगारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. नाईलाज म्हणून काही आगार बंद करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन असल्याचे सूत्रंनी सांगितल़े काही आगारे बीओटी तत्त्वावर चालविण्याची तयारीही महामंडळाने केली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
 
च्एसटीचा तोटा कसा कमी करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. काही आगारे बंद करण्यासारखे निर्णय प्रायोगिक तत्त्वावर करून पाहू. एसटीच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. 
 
च्भविष्यात काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर एसटीच्या भल्यासाठी ते घ्यावे लागतील; परंतु एसटीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजय खंदारे यांनी सांगितले.

 

Web Title: STT 222 commissions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.