एसटीची ‘अब्रू’ संकटात

By admin | Published: July 27, 2014 02:00 AM2014-07-27T02:00:10+5:302014-07-27T02:00:10+5:30

सध्या प्रवाशांनी पाठ फिरवलेली असतानाच दुसरीकडे याच महामंडळात काम करणा:या महिला कर्मचा:यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

In STT 'Abru' crisis | एसटीची ‘अब्रू’ संकटात

एसटीची ‘अब्रू’ संकटात

Next
सुशांत मोरे - मुंबई
‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणा:या एसटी महामंडळाच्या सेवेकडे सध्या प्रवाशांनी पाठ फिरवलेली असतानाच दुसरीकडे याच महामंडळात काम करणा:या महिला कर्मचा:यांच्या तक्रारींकडे  दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत 15 लैंगिक आणि मानसिक छळाच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. अशा वर्षाला सरासरी महिला कर्मचा:यांच्या 40 तक्रारी येत असून, त्या थांबविण्यात प्रशासनाला अपयशच येत आहे. 
एसटी महामंडळात गेल्या काही वर्षात महिला कर्मचा:यांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. 2013मध्ये चंद्रपूर विभागातील आगारात 2 तर मुंबईतील मुंबई सेंट्रल आगारातील महिला वाहकासोबत आणि प्रत्यक्षात मुख्यालयात एका महिला कर्मचा:यासोबत मानसिक आणि लैंगिक छळाच्या घटना घडल्या. सातत्याने होणा:या घटनांनंतर एसटी महामंडळाकडून एक निर्णयही घेण्यात आला. महिलांमध्ये काम करताना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासोबत महिला कर्मचा:यांची 2013मध्येच एक बैठकही झाली. 
या बैठकीत महिलांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर एक अजब सूचना अध्यक्षांकडून त्या वेळी करण्यात आली होती. यापुढे महामंडळातील महिला कर्मचा:यांनी पुरुष कर्मचा:यांशी बोलताना अरे तुरे नाही, तर अहो जाओ, असे बोलावे. त्यामुळे समोरच्या पुरुषाला एक आदर राहील, असे महिला कर्मचा:यांना सांगितले. त्याचप्रमाणो महामंडळातील महिला कर्मचा:यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांचे एक पत्रकही महामंडळाकडून जारी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या सर्व  उपाययोजना आणि सूचना गेल्या कुठे, असा प्रश्न आता पडला आहे. 2014मध्ये सहा महिन्यांत महिलांबाबतीत 15 लैंगिक आणि मानसिक छळाच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे आल्या असल्याचे एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक आर.आर. पाटील (कर्मचारी वर्ग) यांनी सांगितले. वर्षाला या तक्रारींचे प्रमाण सरासरी 40 एवढे आहे. यात  छोटय़ा-छोटय़ा तक्रारीही असतात. मात्र त्यांची सोडवणूक वेळेवर केली जात असल्याचा दावा, पाटील यांनी केला आहे. परंतु एसटीच्या महिला लैंगिक अत्याचारविरोधी समितीकडे या तक्रारी गेल्यानंतर परिवहन विभागाकडेही या तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत. तरीही त्यांची सोडवणूक अजूनही झालेली नसल्याचे सूत्रंनी सांगितले.
 

 

Web Title: In STT 'Abru' crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.