एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार लवकरच नवा गणवेश
By Admin | Published: April 22, 2016 03:58 AM2016-04-22T03:58:49+5:302016-04-22T03:58:49+5:30
चालक, वाहक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खाकी गणवेशाला एस. टी. महामंडळ रामराम ठोकणार आहे. नवीन गणवेश निवडण्याची प्रक्रिया सुरू असून
पुणे : चालक, वाहक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खाकी गणवेशाला एस. टी. महामंडळ रामराम ठोकणार आहे. नवीन गणवेश निवडण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तीन महिन्यात कर्मचाऱ्यारी नवीन गणवेशात दिसतील, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरूवारी पुण्यात दिली.
एसटीमधील रखडलेल्या तब्बल ६०० हून अधिक बढतीच्या प्रस्तावांना नुकतीच महामंडळाने मान्यता दिलेली आहे. या बढती झालेल्या अधिकाऱ्यांचा तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार रावते यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुख्य लेखा अधिकारी एकनाथ मोरे, वाहतूक महाव्यवस्थापक कँप्टन सनय पाटील यावेळी उपस्थित होते.
रावते म्हणाले की, एसटीमध्ये सध्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी खाकी गणवेश आहे. त्यामुळे अधिकारी, चालक, वाहक यांच्यात कोणताही फरक दिसत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास दिसत नाही. केंद्राच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन डिझायनिंग या संस्थेस गणवेशाचे काम देण्यात आले आहे.