‘एसटीची भरती प्रक्रिया पूर्णत: संगणकीय’

By Admin | Published: June 30, 2017 01:57 AM2017-06-30T01:57:43+5:302017-06-30T01:57:43+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय पद्धतीने होणार आहे. माझ्यासह कोणाचाही वशिला इथे चालणार नाही.

'STT recruitment process is fully computerized' | ‘एसटीची भरती प्रक्रिया पूर्णत: संगणकीय’

‘एसटीची भरती प्रक्रिया पूर्णत: संगणकीय’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय पद्धतीने होणार आहे. माझ्यासह कोणाचाही वशिला इथे चालणार नाही. त्यामुळे परीक्षार्थींनी भूलथापांना बळी न पडता परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. येत्या २ जुलै रोजी चालक, वाहक पदाच्या लेखी परीक्षा आहेत. कोकण विभागातील ७९२९ चालक-वाहक पदांसाठी ही परीक्षा आहे.विविध २७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
आमिषाला फसू नका-
परीक्षा प्रक्रियेत कुठेच मानवी हस्तक्षेप असणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी आमिषाला फसू नये, असे पत्रकच एसटी प्रशासनाने काढले आहे.

Web Title: 'STT recruitment process is fully computerized'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.