एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ महागला

By admin | Published: August 6, 2014 02:41 AM2014-08-06T02:41:16+5:302014-08-06T02:41:16+5:30

एसटीचा चार आणि सात दिवसांचा पास असलेला आवडेल तेथे कोठेही प्रवास 6 ऑगस्टपासून महाग होत आहे. डिङोल दरवाढीमुळे या पासांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

STT 'Travel anywhere you like' expensive | एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ महागला

एसटीचा ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ महागला

Next
मुंबई : एसटीचा चार आणि सात दिवसांचा पास असलेला आवडेल तेथे कोठेही प्रवास 6 ऑगस्टपासून महाग होत आहे. डिङोल दरवाढीमुळे या पासांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.  
हे पास देण्यात येत असलेल्या साधी, निमआराम आणि आंतरराज्य पासांचे दर वाढवण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर ते 14 जून गर्दीचा हंगाम आणि 15 जून ते 14 ऑक्टोबर कमी गर्दीचा हंगाम यानुसार हे पास दिले जातात. 
या पासांच्या दरात पाच रुपयांपासून ते 20 रुपयांर्पयत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी आवडेल तेथे कोठेही प्रवास पास 1 जूनपासून महागले होते. त्या वेळी पासांच्या दरात 10 रुपयांपासून ते 50 रुपयांर्पयतची वाढ झाली होती. (प्रतिनिधी)
 
यापूर्वी देण्यात आलेले परंतु 6 ऑगस्टपासून सुरू होणारे अथवा 6 ऑगस्ट रोजी सुरू असलेले पास त्यांची मुदत संपेर्पयत वैध असतील. या पासधारकांकडून दरातील फरक वसूल केला जाणार नाही, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
डिङोल दरवाढीमुळे 0.81 टक्के भाडेवाढ एसटी महामंडळाकडून 
1 ऑगस्टपासून करण्यात आली होती. यात साधारणत: 5 रुपयांनी एसटी महागली होती. त्यामुळेच आवडेल तेथे प्रवास पासांतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
बस सेवाचार दिवसांच्या पासाचे दर (रु)सात दिवसांच्या पासांचे दर
गर्दीचा हंगामकमी गर्दीचा हंगामगर्दीचा हंगामकमी गर्दीचा हंगाम
प्रौढमुलेप्रौढमुलेप्रौढमुलेप्रौढमुले
साधी80540574537514057051300650
(800)(400)(740)(370)(1400)(700)(1290)(645)
निमआराम93046586043016258151500750
(920)(460)(850)(425)(1605)(805)(1485)(745)
आंतर-राज्य100050093046517508751625815
(990)(495)(920)(460)(1730)(865)(1605) (805)

 

Web Title: STT 'Travel anywhere you like' expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.