पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या आईला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 17:23 IST2017-08-12T14:00:24+5:302017-08-12T17:23:35+5:30
एका आईनेच पोटच्या 22 वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून मागील सहा महिन्यांपासून वेश्यागमनास लावल्याची धक्कादायक बाब ठाण्यात उघडकीस आली आहे.

पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या आईला अटक
ठाणे, दि. 12 - एका आईनेच पोटच्या 22 वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून मागील सहा महिन्यांपासून वेश्यागमनास लावल्याची धक्कादायक बाब ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी उल्हासनगर येथील 40 वर्षीय महिलेस अटक केली. ती मुळची उत्तरप्रदेश येथील आहे .
संबंधित महिला ठाण्यातील तलावपाळी येथे वेश्याव्यसावयासाठी काही महीला घेऊन उभी असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविन्द्र दौंडकर यांच्या पथकाने छापा टाकून तिला ताब्यात घेतले. तसेच त्या मुलीस आणखी एका महिलेची सुटका केली.
शरीर संबंधाकरीता माहिलांची मागणी केल्यास 2000 रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या करवाईत 5070 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून नौपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.