महिला अधिका-याला अटक
By Admin | Published: November 18, 2014 02:40 AM2014-11-18T02:40:12+5:302014-11-18T02:40:12+5:30
इमारतीतील फ्लॅटमधील वायरींगच्या कामाला मंजुरी देण्यासाठी ५ लाखाची लाच घेत असलेल्या महिला विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
मुंबई : इमारतीतील फ्लॅटमधील वायरींगच्या कामाला मंजुरी देण्यासाठी ५ लाखाची लाच घेत असलेल्या महिला विद्युत निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. संध्या सतिश पोळ (वय ५०) असे तिचे नाव असून मुंबई सेट्रल येथील मराठा मंदिराजवळील बेस्ट आगाराच्या आवारात रक्कम स्विकारत असताना ही कारवाई करण्यात आली.
प्रभादेवी परिसराच्या आवारातील दोन इमारतीमधील १०० फ्लॅटचे वायरिंगचे काम एका ठेकेदाराने केलेले आहे. त्यांना परवाना मिळवून देण्याचे काम करणाऱ्या कंपनीने ते योग्य असण्याचा दाखला मिळण्याबाबत उर्जा विभागातील निरीक्षक संगीता पोळ यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी एका फ्लॅटमागे ५ हजारप्रमाणे एकुण ५ लाखाची मागणी केली होती.