कॉपी करताना शिक्षकांनी मारल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

By Admin | Published: September 2, 2016 09:42 PM2016-09-02T21:42:36+5:302016-09-02T21:42:36+5:30

आटाळी गावातील इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकणा-या सार्थक पोहेकर या विद्यार्थ्याने कॉपी पकडल्यावर शिक्षकांनी मार दिल्याने आत्महत्या केली आहे

Student commits suicide by copying teacher | कॉपी करताना शिक्षकांनी मारल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

कॉपी करताना शिक्षकांनी मारल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

googlenewsNext
>- ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 2 - आटाळी गावातील इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकणा-या सार्थक पोहेकर याला परिक्षेत कॉपी करताना शिक्षकांनी पकडले. इतर विद्यार्थ्याच्या समोर त्याला चांगलाच चोप दिला. आपल्या सहका-यांसमोर झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने दुस-या दिवशी आई कामावर गेल्यावर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी सार्थकने चिठ्ठी लिहिली होती. मुलाने आत्महत्या ज्या शिक्षकामुळे केली. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी सार्थकच्या आईने मागणी केली आहे.
 
मोहने परिसरातील पाटील शाळेत इयत्ता 9 वीच्या वर्गात सार्थक शिकत होता. बुधवारी त्याला कॉपी करताना शाळेत शिक्षकाने पकडला. त्याला शिक्षा देण्यासाठी शिक्षकाने चोप दिला. सगळ्य़ा मुलांसोबत शिक्षकाने मारल्याचा प्रसंग सार्थकच्या जिव्हारी लागला. तो घरी आला. दुस:या दिवशी गुरुवारी त्याने घडला प्रकार त्याच्या आईला सांगितला. आईने त्याला शाळेत जाण्यास सांगितले. तो शाळेत गेला नाही. आई घराबाहेर गेली. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजा-यांना हा प्रकार कळताच सार्थकच्या आत्महत्येची माहिती दिली. पोलिसांनी सार्थकचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. सार्थकने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहीली आहे. बदनामीच्या भितीपोटी मी आत्महत्या करीत आहे. माझा लहान भाऊ स्मित याला शिकवून मोठा कर. घरी गणपत्ती नक्की बसव असे चिट्ठीत लिहून ठेवले आहे.
 
सार्थकची आई वृषाली यांनी सांगितले की, मुलगा दुस:या दिवशी शाळेत गेला नाही. तेव्हा त्याला भेटायला त्याचे मित्र व वर्गशिक्षिका घरी आल्या होत्या. सार्थकला सूर्यवशी नामक शिक्षकाने कॉपी प्रकरणावरुन मारले होते. त्याने घडल्या प्रकाराचा धसका घेतला. त्याला मानसिक धक्का बसला. शिक्षकामुळे मुलाचा जीव गेला आहे. त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. त्याला कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गुलाब गोरे यांनी सांगितले की, सार्थकच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीवरून तपास सुरु केला आहे. दोषी आढळून आल्यास संबंधित शिक्षकाच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. .
 

Web Title: Student commits suicide by copying teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.