बस अपघातात विद्यार्थीनीचा मृत्यू
By admin | Published: October 20, 2016 08:34 PM2016-10-20T20:34:30+5:302016-10-20T20:34:30+5:30
शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलंडत असताना एसटी बसने धडक दिल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना २० आॅक्टोबर रोजी येथील महामार्गावरील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात घडली
ऑनलाइन लोकमत
सुलतानपूर (बुलडाणा) : शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलंडत असताना एसटी बसने धडक दिल्याने एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना २० आॅक्टोबर रोजी येथील महामार्गावरील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात घडली. विद्यार्थीनीचे नाव शिवप्रिया रामकृष्ण नालींदे असून ती शिवाजी हायस्कुलची विद्यार्थीनी आहे. घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता.
येथील शिवाजी विद्यालयाची विद्यार्थीनी शिवप्रिया रामकृष्ण नालींदे (वय११ वर्ष) ही गुरूवारी गणित विषयाचा पेपर देवून सकाळी १० वाजता घरी जात होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील चौकातून ती रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या रिसोड पुणे बस क्र. ४३९४ या बसने शिवप्रिया हिला धडक दिली. यात ती एसटी बसच्या चाकाखाली आल्याने जबर जखमी झाली. तिला
तातडीने मेहकर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी जमाव जमला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणाताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस उपनिरिक्षक ताणाजी गव्हाणे,राहणे, निवृत्ती सानप, स.पोलिस उपनिरिक्षक धिरेंद्रसिंग बिलवाले यांनी घटनास्थळी भेट देवून
वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या.