विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:07 PM2019-08-02T12:07:02+5:302019-08-02T12:17:31+5:30

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका २५ वर्षांपूर्वी बंद झाल्या होत्या..

The student elections date declared in the state | विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला

विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला

Next
ठळक मुद्देविद्यापीठ विद्यार्थी परिषद : २४ सप्टेंबर रोजी मतदान तर २७ सप्टेंबर रोजी निकाल विद्यापीठाकडून महाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : ७ सप्टेंबरला मतदान

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विद्यापीठाकडूनमहाविद्यालयांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ सप्टेंबरला मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल. यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणारआहे. दि. २४ सप्टेंबर रोजी मतदान तर दि. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करणार आहे.

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका २५ वर्षांपूर्वी बंद झाल्या होत्या. या निवडणुकांमधील राजकीय पक्षांचा हस्तक्षेप व हिंसाचार वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागला होता. आता पुन्हा नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयांमध्ये निवडणुका सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाने बुधवारी (दि. ३१) रात्री निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करत बिगुल वाजविला आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे. आधी महाविद्यालय स्तरावरील सभापती, सचिव, महिला प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधी या पदांसाठी निवडणूक होईल. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी सभापती, सचिव, महिला प्रतिनिधी व मागासवर्गीय प्रतिनिधी या पदांसाठीची निवडणूक पार पडेल. महाविद्यालयांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी विद्यापीठातील निवडणुकीसाठी मतदान करतील.
निवडणूक वेळापत्रकानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसूचना २१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. २९ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. 
मतदानानंतर महाविद्यालयातच मतमोजणी करून लगेच निकाल घोषित केला जाईल. महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर लगेच ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, २४ सप्टेंबर 
मतदान तर २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणूक कार्यक्रम असेल. मतदानाची प्रक्रिया संबंधित महाविद्यालयात तर मतमोजणी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये होईल. निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
..........
विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणूक वेळापत्रक
च्दि. ९ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे
च्दि. ११ सप्टेंबर - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणे
च्दि. १३ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे
च्दि. १४ व १५ सप्टेंबर - उमेदवारी अर्ज दाखल करणे
च्दि. १६ सप्टेंबर - अर्जांची छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे
च्दि. १७ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे
च्दि. १८ सप्टेंबर - आक्षेपांवर निर्णय घेऊन वैध व अवैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे
च्दि. १९ व २० सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे
च्दि. २० सप्टेंबर - पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे
च्दि. २४ सप्टेंबर - मतदान
च्दि. २७ सप्टेंबर - मतमोजणी व निकाल
च्दि. २८ सप्टेंबर - एनएसएस/ क्रीडा/ एनसीसी/ सांस्कृतिक यातील सदस्यांचे नामनिर्देशन करणे
च्दि. ३० सप्टेंबर ते १२ आॅक्टोबर - उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब सादर करणे
........
महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक वेळापत्रक
च्दि. २१ ऑगस्ट - निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे
च्दि. २३ ऑगस्ट - मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत आणि तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध करणे
च्दि. २६ ऑगस्ट - मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवणे
च्दि. २७ ऑगस्ट - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे
च्दि. २९ ऑगस्ट - उमेदवारी अर्ज दाखल करणे
च्दि. ३१ ऑगस्ट - अर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे
च्दि. ३ सप्टेंबर - अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे
च्दि. ४ सप्टेंबर - आक्षेपाबाबत सुनावणी घेणे, अपिलानंतर अंतिम अर्जाची यादी प्रसिद्ध करणे
च्दि. ५ सप्टेंबर - अर्ज माघारी घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे
च्दि. ७ सप्टेंबर - मतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकाल
च्दि. ९ ते २१ सप्टेंबर - उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब सादर करणे
.............
महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणूक वेळापत्रक
विद्यार्थ्यांचा विद्यापीठाची मान्यता असलेल्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाला दि. २० आॅगस्टपर्यंत प्रवेश झालेला असावा.
विद्यार्थ्याने एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला नसावा.
विद्यार्थ्याने एटीकेटी घेतलेली नसावी.
३० सप्टेंबर रोजी वयाची २५ वर्षे पूर्ण असावीत.
राखीव  प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक
........
निवडणूक लढविण्यासाठी पात्रत
उच्च  शिक्षणासाठी पहिल्यांदा प्रवेश घेतल्यापासून सात शैक्षणिक वर्षे पूर्ण केली असल्यास.
कोणत्याही विद्यापीठ परीक्षेतील गैरप्रकारामध्ये शिक्षा झालेली असल्यास.
नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असलेल्या कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविले असल्यास.

Web Title: The student elections date declared in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.