विद्यार्थ्यांनी बनवली फॉर्म्युला ‘वायू कार’

By Admin | Published: January 15, 2017 01:52 AM2017-01-15T01:52:58+5:302017-01-15T01:52:58+5:30

खारघरमधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी आठ महिन्यांच्या परिश्रमाने कार बनवली आहे. लोकसहभागातून तयार केलेल्या या कारला ‘वायू’ हे नाव देण्यात आले आहे.

Student made Formula 'gas car' | विद्यार्थ्यांनी बनवली फॉर्म्युला ‘वायू कार’

विद्यार्थ्यांनी बनवली फॉर्म्युला ‘वायू कार’

googlenewsNext

- वैभव गायकर ल्ल पनवेल (रायगड)

खारघरमधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी आठ महिन्यांच्या परिश्रमाने कार बनवली आहे. लोकसहभागातून तयार केलेल्या या कारला ‘वायू’ हे नाव देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या कारला रॉयल इनफिल्ड या कंपनीचे दुचाकीचे इंजिन लावण्यात आले आहे. मेक इन इंडिया आणि ब्रँड इंजिनीअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ही कार बनविण्यात आली आहे.
कार बनविण्याकरिता विद्यार्थ्यांना आठ लाख रुपये खर्च आला आहे. शनिवारी या कारचे लॉंचिंग खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले. अभियांत्रिकीच्या ३२ विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय, तृतीय व चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. २५ जानेवारी रोजी तामिळनाडू
येथील कोइम्बतूर येथे कारची चाचणी होणार आहे. ‘फॉर्म्युला भारत’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. राष्ट्रीय स्तरासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील जगविख्यात फॉर्म्युला कारसंदर्भात जाणकार या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. कार बनविण्यासाठी नेमलेल्या टीमचे समन्वयक म्हणून भावना पाटील यांनी काम पाहिले.

गाडीची वैशिष्ट्ये
4.23 सेकंदात सुमारे 60 कि.मी. वेगाने
ही गाडी धावू शकते.

- कितीही वेगात गाडी वळवल्यास ती पलटत नाही, तसेच ही कार बनवण्यासाठी या विद्यार्थ्यांना मुंबईमधील वांद्रे, चर्नी रोड, पनवेल येथील आॅटोमोबाइल कंपन्यांनी मदत केली आहे.

Web Title: Student made Formula 'gas car'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.