पार्टीसाठी गेलेला विद्यार्थी सुमद्रात बेपत्ता

By Admin | Published: February 14, 2016 12:26 AM2016-02-14T00:26:27+5:302016-02-14T00:26:27+5:30

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेला संकेत खानविलकर हा १४ वर्षांचा विद्यार्थी मांडवी किनाऱ्यावर समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३०च्या

Student missing for party | पार्टीसाठी गेलेला विद्यार्थी सुमद्रात बेपत्ता

पार्टीसाठी गेलेला विद्यार्थी सुमद्रात बेपत्ता

googlenewsNext

रत्नागिरी : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी गेलेला संकेत खानविलकर हा १४ वर्षांचा विद्यार्थी मांडवी किनाऱ्यावर समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास घडली.
संकेत खानविलकर हा रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये नववीमध्ये शिकत होता. शनिवारी दुपारी १ ते २ या वेळेत नववीचा घटक चाचणी परीक्षेचा भूगोलचा शेवटचा पेपर देऊन तो आपल्या मित्रांसह शाळेतून बाहेर पडला. त्याचा वर्गमित्र दीपक सुरेश झोरे याचा शुक्रवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त पार्टी करण्याचे मित्रांनी ठरविले. त्याप्रमाणे संकेतबरोबर त्याचे सर्व मित्र निखिल विनय कांबळे, दीपक झोरे, हृषीकेश राजेश शेलार आणि अक्षय कृष्णा वरक हे आठवडा बाजारातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे पार्टीनिमित्त त्या पाचही जणांनी भरपूर नाश्ता केला.
यानंतर ते सर्व जण मांडवी किनाऱ्यावरील घुडेवठार येथे समुद्रकिनारी फिरायला गेले. तेथे बराच वेळ मौजमजा केल्यानंतर संकेत एकटाच समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर अन्य दोन मित्रही पाण्यात गेले.
संकेत पोहत असतानाच अचानक लाट आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. त्या वेळी त्याच्या दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्नही केला. मात्र, ओहोटी असल्याने लाटेच्या पाण्याबरोबर तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. संकेत हा आपल्या
आजी-आजोबांकडे राहत होता. त्याची आई मुंबईत असते. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात
येत आहे. त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Student missing for party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.