विद्यार्थी संघाच्या निवडणुका होणार

By admin | Published: December 22, 2015 02:26 AM2015-12-22T02:26:50+5:302015-12-22T02:26:50+5:30

विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होणार असून सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत राज्यातील

Student Union elections will be held | विद्यार्थी संघाच्या निवडणुका होणार

विद्यार्थी संघाच्या निवडणुका होणार

Next

नागपूर : विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुका होणार असून सोमवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत राज्यातील अकृषी विद्यापीठांसाठी नवीन विद्यापीठ अधिनियम विधेयक सादर केले. त्यात नियम १०१ अंतर्गत विद्यार्थी संघाच्या स्थापनेसाठी नवीन तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थी संघ मात्र कुठल्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नाही, अशी अटही ठेवण्यात आली आहे. सन १९९५ मध्ये महाराष्ट्रात विद्यापीठ अधिनियम १९९४ लागू झाल्यापासून विद्यार्थी संघाच्या खुल्या निवडणुकीऐवजी मेरिटच्या आधारावर विद्यार्थी प्रतिनिधींची निवड केली जात आहे. सुरुवातीपासूनच विद्यार्थी संघटनांचा त्याला विरोध असल्याने लिंगडोह समिती स्थापन करण्यात आली. समितीने निवडणुका घेण्याची शिफारस केली होती. त्याचा अभ्यास करून सरकारने मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची समिती गठित केली होती. समितीने अटी व शर्तीसह खुल्या निवडणुका घेण्यास सहमती दर्शविली होती. विधेयक मंजूर झाल्यास २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
निवडणुकीमध्ये अध्यक्ष, सचिव व एका महिला प्रतिनिधीची निवड केली जाईल. आरक्षित प्रवर्गातून एका प्रतिनिधीची निवड होईल. एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून एकाला विद्यापीठाचे कुलगुरू नामनिर्देशित करतील. प्राचार्य-विद्यार्थी परिषदेच्या समन्वयकासाठी एका ज्येष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती होईल. विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सदस्य मिळून एक अध्यक्ष, सचिव व महिला प्रतिनिधींची निवड करतील. (प्रतिनिधी)

Web Title: Student Union elections will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.