कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी!...
By admin | Published: July 5, 2016 09:21 PM2016-07-05T21:21:00+5:302016-07-05T21:21:00+5:30
राज्यातील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयांकडे यंदा विद्यार्थ्यांनी सफशेल पाठ फिरवली असून ह्यकुणी विद्यार्थी देता का विद्यार्थीह्ण असे आवाहन करण्याची वेळ महाविद्यलयांवर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : राज्यातील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयांकडे यंदा विद्यार्थ्यांनी सफशेल पाठ फिरवली असून ह्यकुणी विद्यार्थी देता का विद्यार्थीह्ण असे आवाहन करण्याची वेळ महाविद्यलयांवर आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून चालविण्यात येणाऱ्या या महाविद्यालयांमध्ये यंदा १ लाख ७३ हजार ३१० प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. मात्र प्रवेशासाठी यंदा केवळ ८८ हजार ८१५ विद्यार्थ्यांनीच अर्ज केल्याने सुमारे निम्म्या जागा रिक्त
राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीनंतर किमान ८४ हजार ४९५ जागा रिक्त राहणार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकीकडे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार असून उरलेल्या जागा कशा भरायच्या असा प्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर उपस्थित झाला आहे. परिणामी राज्यातील सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांतील सरासरी
निम्म्या जागा रिकाम राहण्याची भीती निर्माण झाली आहे. रिक्त जागांचा मोठा फटका विनाअनुदानित महाविद्यालयांना बसणार असून पुढील वर्षी मोठ्या संख्येने महाविद्यालये बंद पडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
याआधी राज्यात पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १८ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर दोनवेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र अखेर ४ जुलैपर्यंत केवळ ८८ हजार ८१५ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची संख्या ही एक हजाराने कमी झाली आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या प्रवेशाच्या संख्येतही
यंदा मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी एकूण जागांपैकी केवळ ८९ हजार ५२५ जागांवर प्रवेश झाले होते. याउलट ८३ हजार ७८५ जागा रिक्त राहिल्या होत्या.
....................
अशी असेल पुढील प्रवेश प्रक्रिया -
पॉलिटिक्निकच्या प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी ही २ जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. तर यातील पूर्ण झालेली पक्की यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
यादीत अर्ज केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विकल्प आणि इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशाचा दुसरा कॅप राऊंड ११ ते १५ जुलैदरम्यान घेण्यात येणार असून
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा दुसरा कॅप राऊंड १७ जुलैला होईल. तिसरा कॅप राऊंड २३ जुलैला आणि प्रवेश २७ जुलैपर्यंत होणार असून ५ आॅगस्टच्या चौथ्या कॅप राऊंडनंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल.
..................
सवार्धिक अर्ज पुण्यातून
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील विद्यार्थी अद्यापही पॉलिटेक्निकसाठी अर्ज करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक म्हणजे ८ हजार ६८३ अर्ज आले आहेत. तर त्यापाठोपाठ अहमदनगरमधून ४ हजार ९५२,
नाशिकमधून ६ हजार ७३०, मुंबईतून ५ हजार ९३२, ठाण्यातून ५ हजार ३४८, कोल्हापुरमधून ५ हजार १५९, सोलापुरमधून ४ हजार ९८४, नागपुरमधून ४ हजार २८७, जळगावमधून ३ हजार ५८२, औरंगाबादमधून ३ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी
अर्ज केले आहेत.
.................................................
राज्यातील महाविद्यालयांची संख्या -
सरकारी - ४३,
अनुदानीत - १८,
विनाअनुदानीत - ४२९
...............................
उपलब्ध प्रवेशाच्या एकूण जागा- १,७३,३१०
गतवर्षी झालेले प्रवेश - ८९,५२५
गतवर्षीच्या रिक्त जागा - ८३,७८५
........................................
यंदा आलेले प्रवेश अर्ज - ८८,८१५
किमान रिक्त राहणाऱ्या जागा - ८४,४९५