विद्यार्थिनीला मिळणार ‘फी’ परत

By admin | Published: October 1, 2014 12:26 AM2014-10-01T00:26:39+5:302014-10-01T00:26:39+5:30

वैयक्तिक कारणांमुळे एका दिवसातच होस्टेल सोडणा:या विद्यार्थिनीला फीची रक्कम नाकारणा:या होस्टेलला ग्राहक मंचाने दणका दिला.

Student will get 'fee' back | विद्यार्थिनीला मिळणार ‘फी’ परत

विद्यार्थिनीला मिळणार ‘फी’ परत

Next
>पुणो : वैयक्तिक कारणांमुळे एका दिवसातच होस्टेल सोडणा:या विद्यार्थिनीला फीची रक्कम नाकारणा:या होस्टेलला ग्राहक मंचाने दणका दिला. विद्यार्थिनीने होस्टेल किंवा  तेथील व्यवस्थापनाचा कोणताही नियम मोडला नाही किंवा तिच्यावर कोणताही आरोप नसताना ही फीची रक्कम परत न करणो हे होस्टेल व्यवस्थापनाच्या कामातील चूक असल्याचे नमूद करत मंचाने तिची 7क् हजार फीसह तिच्या नुकसानभरपाईसाठी 1क् हजार रूपये देण्याचा आदेश दिला.
ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी श्रृती सत्यनारायण खंडेलवाल (रा. मूळ इंदौर) यांनी तक्रार दिली आहे. श्रृती हिने सहेली होम लेडीज होस्टेल, रूतुजा पार्क कमिन्स कॉलेजजवळ, कव्रेनगर यांच्याविरूद्ध तक्रार दिली आहे. श्रृती हिने एसएनडीटी विद्यापीठात ‘स्कुल ऑफ फॅशन टेकनॉलॉजी ’साठी प्रवेश घेतला होता. श्रृती मूळ इंदौरची असल्याने त्यांना होस्टेलमध्ये प्रवेश घेण्याची गरज होती त्यानुसार विद्यापीठाच्या नजीकच सहेली होम होस्टेल मिळाले त्यांनी तेथे प्रवेश घेतला. त्यासाठी प्रथम 1क् हजार व नंतर 7क् हजार असे 8क् हजार रूपये भरले. सामान घेऊन त्यांनी तेथे प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना स्वत:च्या वैयक्तिक कारणामुळे दुस:या दिवशी सकाळी होस्टेल सोडावे लागले. यासाठी त्यांनी लेखी अर्ज लिहिला.तेथील व्यवस्थापकाने 1क् हजार रूपये परत केले मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले.  त्यामुळे श्रृती यांनी अॅड सुदीप केंजळकर व अॅड निखील निकम यांच्यामार्फत ग्राहक मंचात तक्रार दिली. मंचाने कागदपत्रंची पाहणी केली. 
 
4श्रुतीने नियमभंग केलेला नाही किंवा तिच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. तसेच तिने तिच्या वैयक्तिक कारणामुळे होस्टेल सोडत असल्याचा अर्ज ही केला होता त्यामुळे तिची फीची रक्कम परत न करणो हे सेवेतील त्रुट आहे. त्यामुळे सहेली होस्टेलने तिची 7क् हजार रूपये फी व मानसिक नुकसानभरपाई म्हणून 1क् हजार रूपये देण्याचा आदेश दिला. 

Web Title: Student will get 'fee' back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.