अकरावी सायन्ससाठी विद्यार्थ्यांची कार्यशाळा
By admin | Published: June 10, 2016 12:59 AM2016-06-10T00:59:38+5:302016-06-10T00:59:38+5:30
अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत सीएनएक्स’ आणि ‘सप्तर्षी क्लासेस’ तर्फे येत्या रविवारी (१२ जून) मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे.
पुणे : अकरावी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत सीएनएक्स’ आणि ‘सप्तर्षी क्लासेस’ तर्फे येत्या रविवारी (१२ जून) मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयावरच विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल निश्चित होत असते. मात्र, नेमकी वाटचाल कशी करावी, याबाबत बहुतेक विद्यार्थ्यांसह पालकांच्याही मनात संभ्रम असतो. बारावीनंतर अनेकांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असतो, त्यासाठी एमएच-सीईटी, जेईई, नीट या प्रवेशपरीक्षा लागू करण्यात आल्या आहेत. अनेकांना या परीक्षेतील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन अपेक्षित असते. या कार्यशाळेत करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर व सप्तर्षी क्लासेसचे संचालक अमित नवले मार्गदर्शन करणार आहेत.
अश्वमेध हॉल , कर्वे रस्ता येथे रविवारी १२ जूनला सायंकाळी ६ वाजता कार्यशाळा होणार आहे.
दोन तासांच्या या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी सप्तर्षी कोचिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने पुढाकार घेतला असून, सप्तर्षी संस्थेच्या दोन शाखा आहेत. नाव नोंदणीसाठी संपर्क - ९८५०७३५३३५, ८००७०७०२६०