आदिवासी शाळेत विद्यार्थी भोगताहेत नकरयातना

By admin | Published: November 3, 2016 11:27 PM2016-11-03T23:27:17+5:302016-11-03T23:27:17+5:30

दहावर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेल्या पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थी नकरयातना भोगत असल्याचे

Students are enjoying tribal school | आदिवासी शाळेत विद्यार्थी भोगताहेत नकरयातना

आदिवासी शाळेत विद्यार्थी भोगताहेत नकरयातना

Next
>ऑनलाइन लोकमत/ गणेश मापारी 
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 03 - दहावर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेल्या पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत शेकडो विद्यार्थी नकरयातना भोगत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी असलेल्या गव्हाचे पिठ उघड्यावर असून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृह व शौचालयांना दरवाजे नसल्याचा प्रकार या शाळेला गुरुवारी ‘लोकमत’ने दिलेल्या भेटी दरम्यान दिसून आला आहे.
एकविसाव्या शतकाच्या या तांत्रिक युगातही आदिवासी समाजातील हजारो मुले शिक्षणापासून वंचित आहेत. आदिवासींची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी यासाठी शासनाकडून आदिवासी निवासी आश्रम शाळांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्या जात आहे. या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसोबतच अल्पोपहार, दोन्ही वेळचे जेवण त्याचप्रमाणे पुस्तके आणि गणवेश पुरविणाºया निवासी आश्रम शाळांच्या संस्थांना लाखो रुपये अनुदान दरवर्षी दिल्या जात आहे.  दरम्यान खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी शाळेच्या एका दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगीक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  या शाळेतील अनेक चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. सदर आश्रम शाळेत ३८० विद्यार्थी असून यामध्ये १०५ विद्यार्थिनी आहेत. श्री रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूर द्वारा संचालित स्व.निंबाजी कोकरे अनुदानीत प्राथमिक आदिवासी या शाळेला प्रति विद्यार्थी ९०० रुपये याप्रमाणे अनुदान दिल्या जाते. अनुदानाची लाखो रुपयांची रक्कम  मिळत असतानाही येथील विद्यार्थी मात्र विविध सुविधांपासून वंचित आहेत.
शाळेच्या परिसरात असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या शौचालय व स्वच्छता गृहांना दरवाजे नसल्याचे चित्र या शाळेमध्ये दिसून आले आहे. विशेष म्हणजे शाळांना सुटी असतानाही या शाळेतील स्वयंपाकगृह खुले असून स्वयंपाकगृहातील गव्हाचे पीठ उघड्यावर ठेवण्यात आले आहे. गव्हाच्या पिठामध्ये उंदिरांचे वास्तव्य दिसून आले असून पिण्याच्या पाण्याची देखील योग्य व्यवस्था नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे. 
 
शाळेच्या आवारातच थाटला आहे ‘वेल्डींग’चा व्यवसाय
आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व्यायामासाठी आवश्यक असे कोणतेही साहित्य शाळेच्या आवारात नाही. उलट आवारामध्येच ‘वेल्डींग’चा व्यवसाय थाटला असल्याचे चित्र या शाळेत दिसून आले आहे. त्याचप्रमाणे वेल्डींग व्यवसायाला लागूनच आवारात पिठगिरणी सुध्दा लावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हिवाळ्याच्या दिवसामध्ये आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी लावण्यात आलेले यंत्रही निकामी असल्याचे दिसून आले आहे.
 
शाळेच्या पिठगिरणीतही निकृष्ट दर्जाचे पीठ
विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी देण्यात यावे असे निर्देश असतानाही पाण्याच्या टाकीला नळ लावलेले याठिकाणी दिसून येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्याही स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसून स्वयंपाक गृहात गव्हाचे पीठ उघड्यावरच ठेवण्यात आले आहे. शाळेच्या आवारातच असलेल्या पिठगिरणीत भंगार साहित्य पडलेले असून पिठगिरणीमध्ये सुध्दा निकृष्ट दर्जाचे पीठ दिसून आले आहे. विशेष म्हणजे जिवाला धोका असणाºया विद्युतप्रवाहीत तार पिठगिरणीमध्ये उघड्यावरच आहेत.
 
पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत सुरु असलेला गैरप्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे. शुक्रवारी या शाळेला भेट देण्यात येणार असून नियमबाह्य तसेच विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाºया बाबींची तपासणी करुन संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
- व्ही.ए.सोनवणे
प्रकल्प अधिकारी,आदिवासी प्रकल्प कार्यालय अकोला
 
पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत आमच्या गावातील मुली शिक्षणासाठी आहेत.गावातील अल्पवयीन मुलींचे लैंगीक शोषण झाल्याचा प्रकार गंभीर आहे. या घटनेमुळे मुलीचे जीवन उद्धवस्त झाले आहे. अत्याचार करणाºया कर्मचाºयांवर कठोर कारवाई करावी.
- बुलिस्टरनाबाई भोसले
सरपंच,हलखेडा,
ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव खां.

Web Title: Students are enjoying tribal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.