आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

By Admin | Published: July 6, 2016 08:09 PM2016-07-06T20:09:28+5:302016-07-06T20:09:28+5:30

राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत

Students' flag for ITI admission | आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील
शासकीय आणि खाजगी आयटीआयमधील १ लाख ३२ हजार जागांसाठी अवघे १० दिवस पूर्ण होण्याआधीच ३ लाख ७९ हजार ६३८ रजिस्ट्रेशन क्रमांक तयार करण्यात आले आहेत. याचाच अर्थ सरासरी एका जागेसाठी ३ रजिस्ट्रेशन क्रमांक तयार
करण्यात आले आहेत.
यंदाही राज्यात आॅनलाईन पद्धतीने आयटीआय प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे. २७ जून २०१६ रोजी सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३ लाख ७९ हजार ६३८ रजिस्ट्रेशन क्रमांक तयार करण्यात आले होते. त्यांपैकी ३ लाख २६ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज पूर्णपणे भरले आहेत, तर २ लाख १५ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरून
आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील स्थान निश्चित केले आहे. याचाच अर्थ सरासरी २ जागांसाठी ३ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत. तर रजिस्ट्रेशन क्रमांकाची संख्या पाहता सरासरी एका जागेसाठी तीन रजिस्ट्रेशन क्रमांक तयार झालेले आहेत.
एकीकडे पॉलिटेक्निक प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असताना, आयटीआय प्रवेशाला मिळणारा प्रतिसाद पाहता आश्चर्य व्यक्त होत आहे.
आयटीआयचा समावेश कौशल्य विकास व उद्योजकता विभागात केल्याने हा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे पॉलिटेक्निक प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने तंत्रशिक्षण संचालनालयाची डोकेदुखी वाढली
आहे.
..................................................
१० जुलैला मुदत संपणार
आॅनलाईन प्रवेश अर्ज करण्याची मुदत १० जुलै रोजी संपत आहे. ११ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करून पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य देणे बंधनकारक आहे. १२ जुलैला सकाळी ११ वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. तर १४ जुलैला सकाळी ११ वाजता प्रवेशाची पहिली प्रवेश फेरी पार पडणार आहे. त्यानंतर २० जुलैला दुसरी प्रवेश फेरी, २९ जुलैला तिसरी प्रवेश फेरी, ६ आॅगस्टला चौथी प्रवेश फेरी आणि १ आॅगस्टला जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच पाचवी प्रवेश फेरी पार पडेल. त्यासोबतच १ आॅगस्टला सकाळी ८ वाजेपासून १७ आॅगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत संस्थास्तरीय समुपदेशनाची सहावी प्रवेश फेरी पार पडणार आहे.

Web Title: Students' flag for ITI admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.