Corona Vaccination: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून राहिले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 06:22 PM2021-05-31T18:22:10+5:302021-05-31T18:22:31+5:30

Corona Vaccination: लसीच्या अपुऱ्या साठेमुळे फक्त ५० विद्यार्थ्यांना लस मिळाली.

students going abroad for higher education remain deprived of corona vaccination | Corona Vaccination: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून राहिले वंचित

Corona Vaccination: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे शेकडो विद्यार्थी लसीकरणापासून राहिले वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आजपासून राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर हॉस्पिटलमध्ये वॉक-ईन द्वारे सोमवार, मंगळवार व बुधवारी लसीकरण सुरू करण्याचे सुधारित परिपत्रक मुंबई महानगर पालिकेने गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा जारी केले होते. मात्र आज सकाळी कूपर हॉस्पिटलमध्ये उच्च शिक्षगा साठी परदेशी जाणारे ५०० विद्यार्थी आले खरे, मात्र लसीच्या अपुऱ्या साठेमुळे फक्त ५० विद्यार्थ्यांना लस मिळाली. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित साटम यांनी लोकमतला ही माहिती दिली.सदर प्रकरणाची माहिती देणारा व्हिडिओ देखिल त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

त्यामुळे या विद्यार्थ्यांना मूर्ख बनवणाऱ्या राज्य सरकारच्या काही मंत्री व मुंबई महानगर पालिकेचा आमदार साटम यांनी तीव्र निषेध केला.भाजपा तर्फे मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या लसीकरण कॅम्प मधून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थीनी नोंदणी करावी,जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार साटम यांनी दिले.

Web Title: students going abroad for higher education remain deprived of corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.