शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
By admin | Published: February 24, 2015 12:06 AM2015-02-24T00:06:06+5:302015-02-24T00:47:23+5:30
चिमुकल्या मुखातून 'जहर खाऊ नका'चा गजर.
मयुर गोलेच्छा/लोणार: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी बुलडाणा जिलतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. लोणार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये ह्यजहर खाऊ नकाह्ण या गीताचा गजर करून शेतकरांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पाल्यांच्या मुखातून या गीताचे स्वर कानी पडून खचलेल्या शेतकर्यांना जगण्याचे बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज अशा प्रश्नांमुळे विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. या स्थितीचे चित्रण करणारे विदर्भातील नामवंत कवी, चित्रपट दिग्दर्शक प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांच्या ह्ययमाच्या गावाला जाऊह्ण या चित्रपटातील ह्यजहर खाऊ नका, पाठ जगाला दावू नकाह्ण हे गीत शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रभावी ठरू शकणारे आहे. म्हणूनच परिपाठाच्यावेळी विद्यार्थ्यांकडून ते म्हणवून घेण्यात येत आहे. शेतकर्यांनी आत्महत्या न करता धैर्याने संकटांचा सामना करावा. शाळेत शिकणारी त्यांची मुलं जेव्हा दररोज ह्यजहर खाऊ नकाह्ण हे गीत गातील, तेव्हा त्यामुळे शेतकर्यांच्या मानसिकतेमध्ये नक्कीच फरक पडेल, असा आशावाद लोणार गट शिक्षण अधिकारी दादाराव मसुदवाले यांनी व्यक्त केला.