दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

By admin | Published: June 28, 2016 12:33 AM2016-06-28T00:33:12+5:302016-06-28T00:33:12+5:30

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

Students revisited the return to Class X-XII | दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

Next


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी/ मार्च २०१६ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने नापास विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यंदा बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्जच केले नाहीत. त्यामुळे परीक्षेची संधी असूनही अनेक विद्यार्थी पुनर्परीक्षेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेस कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. त्याच प्रमाणे मार्च २०१६ मध्ये राज्यातील १६ लाख १ हजार ४०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यातून १४ लाख ३४ हजार १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीत नापास झाले. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा वेळापत्रक संकेतस्थळावर आहे.
राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी १० ते २४ जून या कालावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच २४ जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना ३० मे ते ९ जून या कालावधीत नियमित शुल्कासह बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदत दिली होती. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले असून, सध्या १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे जुलैमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे ५० तर दहावीच्या परीक्षेस सुमारे २५ हजार विद्यार्थी अर्ज करत नसल्याचे समोर आले आहे.
>विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या हेतूने राज्य मंडळातर्फे जुलै महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
>राज्य मंडळातर्फे दहावीच्या पुर्नरपरीक्षेसाठी १० ते २४ जून या कलावधीसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. तसेच 24 जूननंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत दिली आली आहे.
१ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या पुनर्परीक्षेसाठी अर्ज

Web Title: Students revisited the return to Class X-XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.