राज्यातील विद्यार्थी शिकणार राफेल विमानांची देखभाल, दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:56 AM2019-08-27T05:56:43+5:302019-08-27T05:56:53+5:30

दसाल्ट एव्हीएशनसोबत करार : नागपूर आयटीआयमध्ये तीन वर्षांचा अभ्यासक्रम

Students in the state will learn Rafael aircraft maintenance, repairs | राज्यातील विद्यार्थी शिकणार राफेल विमानांची देखभाल, दुरुस्ती

राज्यातील विद्यार्थी शिकणार राफेल विमानांची देखभाल, दुरुस्ती

googlenewsNext

नारायण जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेमध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तोंडाला फेस आणणाऱ्या ‘राफेल’ विमानांची निर्मिती करणारी फ्रान्समधील ‘दसाल्ट एव्हीएशन’ कंपनी आता राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातील आयटीआयमधील तीन तुकड्यांत शिकणाºया १०५ विद्यार्थ्यांना ‘अ‍ॅरोनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड फिल्टर’ या अभ्यासक्रमांचे स्वयंअर्थसहायित प्रशिक्षणप्रायोगिक तत्त्वावर तीन वर्षांकरिता देणार आहे.


येत्या सप्टेंबरमध्ये राफेल विमान भारतात येणार असून अशी ७० विमाने देशात येणार आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, यासाठी नागपूरच्या आयटीआयमध्ये १०५ विद्यार्थ्यांच्या तीन तुकड्यांना दसाल्ट कंपनी आता ‘अ‍ॅरोनॉटिकल आणि स्ट्रक्चर अ‍ॅण्ड फिल्टर’ या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणार असून त्यास राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने २३ आॅगस्ट रोजी मान्यता दिली आहे.


देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ विचारात घेता, उद्योगांची मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेची कार्यक्षमता वाढवण्याकरिता आवश्यक असलेल्या साहित्याच्या डिझाइनपासून ते उत्पादनापर्यंत तसेच त्यांची देखभाल सेवा पुरवण्याचे काम या विमानांचे उत्पादन करणारी फ्रान्सची दसाल्ट कंपनीच करणार आहे.


आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास मान्यता
या करारानुसार दसाल्ट अकादमीचे तज्ज्ञ आॅगस्ट २०१९ ते जुलै २०२१ अशी तीन वर्षे प्रशिक्षण देणार असून आॅगस्ट २०१९ मध्ये दोन तुकड्यांत तत्काळ आॅनलाइन प्रवेशप्रक्रियाही सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी देशाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या महासंचालकांनी आखून दिलेल्या मानकानुसार यंत्र व साधनसामग्री दसाल्ट कंपनी पुरवणार आहे. इतर खर्च प्रशिक्षणासाठी आकारण्यात येणाºया प्रवेश शुल्कातून भागवण्यात यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच तीन वर्षांनंतर याबाबतचा अहवाल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी सादर करावयाचा असून त्यानंतर हा अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवायचा किंवा नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

दसाल्ट अकादमीची स्थापना
या अनुषंगाने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि शैक्षणिक उपक्र म विकसित करण्याकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने सीएसआरअंतर्गत ‘दसाल्ट अकादमी’ची स्थापना केली असून यामार्फत उत्पादन, देखभालीशी संबंधित आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अंतर्गत केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या माध्यमातून ‘अ‍ॅरोनॉटिकल आणि स्ट्रक्चर अ‍ॅण्ड फिल्टर’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी दसाल्ट कंपनीशी ३ जुलै २०१९ रोजी सामंजस्य करार केला आहे.

Web Title: Students in the state will learn Rafael aircraft maintenance, repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.