नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: May 23, 2017 03:08 AM2017-05-23T03:08:21+5:302017-05-23T03:08:21+5:30
बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोळे (ता. कऱ्हाड ) येथे सोमवारी दुपारी घडली. प्रतीक्षा उत्तम काकडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड (जि. सातारा) : बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोळे (ता. कऱ्हाड ) येथे सोमवारी दुपारी घडली. प्रतीक्षा उत्तम काकडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्रतीक्षा कऱ्हाडातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली आहे. येत्या काही दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, परीक्षेतील काही पेपर अवघड गेल्याने प्रतीक्षा तणावाखाली होती. गत काही दिवसांपासून ती नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांना जाणवले होते. त्याबाबत त्यांनी तिची विचारपूस करून समजूतही घातली होती. मात्र, तरीही ती तणावात असल्याचे दिसून येत होते. प्रतीक्षाच्या आईचे निधन झाले असून, वडील शेतकरी आहेत. सोमवारी दुपारी वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या वेळी तिने घरातच दोरीने गळफास घेतला.