दफ्तरासाठी पैसे न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By Admin | Published: June 20, 2017 09:09 PM2017-06-20T21:09:33+5:302017-06-20T21:09:33+5:30

वडिलांनी दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पैसे न दिल्याने बावी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Student's suicide due to non-payment of money | दफ्तरासाठी पैसे न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

दफ्तरासाठी पैसे न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
 उस्मानाबाद, दि. 20 - वडिलांनी दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यास पैसे न दिल्याने बावी येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.अरबाज नबीलाल आतार (रा़बावी, ता़वाशी) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे़. तो कळंब येथील विद्याभवन हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होता.
या वर्षी तो नववीच्या वर्गात गेला होता. त्याने वडिलांना दफ्तर घेण्यास व वस्तीगृहात प्रवेश घेण्यासाठी पैसे मागितले़ त्यावेळी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे ते हतबल झाले़ वडिलांची ही हलाखीची परिस्थिती पाहून निराश झालेल्या अरबाजने शेतातील चिंचाच्या झाडास अंगातील शर्टाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेरणी करीत असलेल्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब दुपारी २ वाजेच्या सुमारास आली़ त्यांनी या प्रकाराची माहिती अरबाजच्या घरी दिली़ याबाबत वाशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे़

पीकविम्याकडे होते डोळे

अरबाजने आत्महत्येपूर्वी पैश्यासाठी वडीलांकडे अतिहट्ट धरला होता़ अडचण होत असल्याने आजच पैैसे द्या, अशी मागणी तो करीत होता़ पीकविमा अद्याप मिळाला नाही़ तो मिळताच पैैसे देवू, असे सांगून वडील नबीलाल त्याची समजूत काढत होते़ मात्र, अरबाजने हताश होवून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला़

Web Title: Student's suicide due to non-payment of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.