रॅगिंगमुळेच विद्यार्थ्याची आत्महत्या!--सचिनच्या पत्रातील महत्त्वाचे उल्लेख

By admin | Published: December 9, 2014 12:47 AM2014-12-09T00:47:56+5:302014-12-09T01:00:13+5:30

पलूसमधील घटना : घातपाताचाही संशय; सचिनने शाळेला लिहिलेल्या पत्राद्वारे तक्रार दाखल होणार

The student's suicide due to ragging! - Important mentions in Sachin's letter | रॅगिंगमुळेच विद्यार्थ्याची आत्महत्या!--सचिनच्या पत्रातील महत्त्वाचे उल्लेख

रॅगिंगमुळेच विद्यार्थ्याची आत्महत्या!--सचिनच्या पत्रातील महत्त्वाचे उल्लेख

Next

आटपाडी : पलूस येथील केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी सचिन लालासाहेब जावीर (वय १५, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) याने आत्महत्या केली नसून, त्याचा घातपात झाल्याचा संशय वडील लालासाहेब जावीर यांनी व्यक्त केला आहे.
या विद्यालयात ८ वी, ९ वीच्या विद्यार्थ्यांवर भयानक पद्धतीने
रॅगिंग होत असल्याच्या सचिनच्या पत्रासह ते जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सचिन जावीर याने विद्यालयाच्या आवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
याबाबत त्याचे वडील लालासाहेब जावीर यांनी सांगितले की, सचिनने आत्महत्या केल्याची विद्यालय प्रशासनाची माहिती चुकीची आहे. गळफास लावलेली दोरी अत्यंत बारीक होती. सचिनचे वजन ५७ किलो होते.
एवढे वजन ती दोरी पेलणे शक्य नाही. त्याचे अंथरुण, पुस्तके विस्कटलेली होती. त्याचा गळा आवळून खून करून नंतर त्याला गळफास अडकवून, आत्महत्येचा बनाव केला आहे, असा आरोप त्यांनी
केला. या विद्यालयात भयानक पद्धतीचे रॅगिंग केले जात होते.
यापूर्वी सचिनने विद्यालयाचे सदन प्रभारी बी. आर. खेडकर यांना लिहिलेले पत्र त्याच्या बॅगेत
सापडले आहे. या पत्रात
विद्यार्थ्यांच्या नावासह रॅगिंगचा उल्लेख करण्यात आला आहे. या
प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)

सचिनच्या पत्रातील महत्त्वाचे उल्लेख
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी नववीच्या सर्व मुलांना रात्री साडेआठ वाजता बेदम मारहाण केली.
नववीच्या चार मुलांची मेस ड्यूटी होती त्यावेळी मेसमध्ये एका सीनिअर विद्यार्थ्याला पाणी प्यायला मिळाले नाही, म्हणून सर्वांनीच लाथा, बुक्क्या, काठीने चार मुलांना मारहाण केली.
११वीच्या एका विद्यार्थ्याने, तो आल्यानंतर नाष्टा करायला येणाऱ्या प्रत्येक नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा स्वत:चा नियम तयार केला
आहे. दरवाजात उभा राहून तो उशिरा आलेल्या प्रत्येक मुलाला मारतो.
रात्री दहा वाजता इयत्ता १२वीचा एक विद्यार्थी रात्री स्टडीरूममधून बाहेर आल्यानंतर टाईमपास म्हणून एकाला झोपेतून उठवून रोज मारहाण करतो.
एकजण जेवणातील वाटाण्याच्या भाजीतील वाटाणे सर्वांना फेकून मारतो, कपडे घाण करतो.
सहा मुले एका विद्यार्थ्याला लावणीवर नाचायला लावतात. त्यात ‘स्लो मोशन’ करायला लावतात.

Web Title: The student's suicide due to ragging! - Important mentions in Sachin's letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.