वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Published: October 30, 2016 06:29 PM2016-10-30T18:29:32+5:302016-10-30T18:29:32+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या चंद्रकांत यशवंत निकुंभ (२१) या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नंदूरबार, दि. 30 - शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या चंद्रकांत यशवंत निकुंभ (२१) या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ऐन दिवाळीतील घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
वरुळ कानडी येथील चंद्रकांत निकुंभ हा लोणखेडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. तो वसतिगृहात रहायला होता. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रुमवर कोणी नसताना त्याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रवींद्र सुभाष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चंद्रकांतवर रविवारी सकाळी वरुळ कानडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तो अनरद येथील एस.आर. विद्यामंदिराचे मुख्याध्यापक यशवंत निकुंभ यांचा मुलगा आहे. चंद्रकांतच्या मोठ्या भावाचा पुढील महिन्यात लग्न समारंभ होणार होता. दिवाळी व लग्नसमारंभ यामुळे कुटुंबात उत्साहाचे वातावरण असताना त्याने जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.