शिक्षकाच्या त्रासाने विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Published: April 16, 2016 02:21 AM2016-04-16T02:21:53+5:302016-04-16T02:21:53+5:30
कन्नड तालुक्यातील जवळी (बु.) येथील ओम शांती माध्यमिक विद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ११ एप्रिलला ही घटना घडली.
देवगाव रंगारी (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील जवळी (बु.) येथील ओम शांती माध्यमिक विद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. ११ एप्रिलला ही घटना घडली.
आरोपी शिक्षक रूपेश अशोक साळवेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जवळी बु. येथील ओम शांती माध्यमिक विद्यालयात कल्याणी विलास हारदे ही विद्यार्थिनी दहावीमध्ये शिकत होती. तिने दहावीत प्रवेश घेतल्यानंतर १३ एप्रिल २०१५ ते ११ एप्रिल २०१६ या कालावधीत साळवे हा कल्याणीला राहत्या घरी, शाळेत, रस्त्यात प्रत्यक्ष भेटून आणि मोबाईलवर एसएमएस पाठवून त्रास देत होता. त्याचा त्रास असह्य झाल्याने तिने ११ एप्रिलला दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले. रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला.
कल्याणीचे वडील विलास हारदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात साळवेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)