विद्यार्थी वाहतुकीचा नाशिक पॅटर्न राज्यभरात राबवणार - दिवाकर रावते

By admin | Published: July 16, 2017 05:30 PM2017-07-16T17:30:26+5:302017-07-16T17:30:26+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले असून राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी

Students will implement the Nashik Pattern of Transportation across the state - Diwakar Rao | विद्यार्थी वाहतुकीचा नाशिक पॅटर्न राज्यभरात राबवणार - दिवाकर रावते

विद्यार्थी वाहतुकीचा नाशिक पॅटर्न राज्यभरात राबवणार - दिवाकर रावते

Next
> ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - शहरात काही दिवसांपूर्वी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना झालेल्या अपघाताच्या घटना तसेच नाशिकरोड परिसरात वाहनाला लागलेली आग गांभीर्याने घेत महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र  वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे जाळे निर्माण झाले असून राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीअशाचप्रकारची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी परिवहन विभाग यंत्रणा राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग व महाराष्ट्र  वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक विभागाच्या प्रयत्नातून सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सुमारे नऊशे वाहतूकदारांना परवाने वितरित करण्यात आले असून महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी शाखेच्या मेळाव्यात यातील 11 वाहनधारकांना रावते यांच्या हस्ते रविवारी प्रातिनिधीक स्वरुपात परवान्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Students will implement the Nashik Pattern of Transportation across the state - Diwakar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.