धनगर आरक्षणाबाबत अहवालाचा अभ्यास सुरू; उच्च न्यायालयात भूमिका मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 01:02 AM2018-09-07T01:02:39+5:302018-09-07T01:04:08+5:30
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने (टिस) धनगर समाजाचा अभ्यास करून त्याचा अहवाल ३१ आॅगस्ट रोजी राज्य सरकारपुढे सादर केला आहे. हा अहवाल विचाराधीन असून सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
धनगर व धनगड हा समाज एकच आहे का? या मुद्द्यावर ‘टिस’ला अभ्यास करण्याची विंनती सरकारने २०१५ मध्ये केली होती. त्यानुसार ‘टिस’ने ३१ आॅगस्टला सरकारपुढे अहवाल सादर केला. त्याचे विश्लेषण व अभ्यास सुरू आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले.
‘धनगड’ महाराष्टÑात नाही
याचिकेनुसार, २०१७ च्या राष्ट्रपतींच्या आदेशात राज्य सरकारने अनुसूचित जमातीत समाविष्ट केलेला धनगड समाज महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. मात्र, ती स्पेलिंग चूक आहे.